आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत बंदचे राज्यातही पडसाद, काही शहरांत बंदला संमिश्र प्रतिसाद तर काही ठिकाणी हिंसक वळण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदचे काहीसे पडसाद महाराष्ट्रात पडताना दिसत आहेत. राज्यातील काही शहरांत बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मात्र बंद केली नाही. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले. काही शहरांमध्ये एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. तर काही ठिकाणी आंदोलकांनी व्यापाऱ्यांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अनेक ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

  • औरंगाबाद बंद मध्ये शहरातील बहुतांश दुकाने बंद, शहरातील मुस्लिमबहुल भागात बंदला सर्वाधिक प्रतिसाद
  • धुळे - येथे चाळीसगाव रोडवर जमावाकडून तुफान दगडफेक. पोलिसांच्या दुचाकी वाहने जाळली. हवेत तीन वेळा गोळीबार
  • भारत बंदला नंदुरबारमध्ये संमिश्र प्रतिसाद
  • अकोला बंद दरम्यान आंदोलकांनी गांधी रोडवरील दुकाने बंद केली
  • धुळ्यात दगडफेक
  • यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन
  • सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने, शहरातील मध्यवर्ती परिसर, बाजारपेठ सुरळीत सुरू. विजापूर वेस परीसरातील दुकाने बंद. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी 1 तास बंद पाळण्यात आला. त्यानंतर निषेध व्यक्त करून लिलाव प्रक्रिया सुरू. 160 गाड्या शेतीमालाची बाजारपेठेत आवक.
  • धुळे येथे बंद दरम्यान नागरिक रस्त्यावर. साक्री रोडवर तणाव. शिरपूला एसटी बसवर दगडफेक.
  • जळगाव - जिल्ह्यातील यावल, रावरे येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद, भुसावळ आणि तंबापूर भागात दगडफेक

मुंबई - कांजूर मार्ग रेल्वे स्टेशनवर बहुजन क्रांती मोर्चाकडून रेल रोको
आज सकाळी बहुजन क्रांति मोर्चाकडून भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग रेल्वे स्टेशनवर रेल रोको करण्यात आला. प्रसंगी मध्य रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोधात बंद पुकारल्याने हे आंदोलन करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...