आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएए-एनआरसीविरुद्ध आज आज भारत बंद; कुणीही बळजबरी दुकाने बंद करू शकणार नाही -पोलिस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध बुधवारी विविध संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदला दिल्लीतील शाहीन बाग येथील महिलांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. बहुजन क्रांती मोर्चाने सुद्धा कडकडीत बंद पाळणार असल्याचे जारी केले आहे. या बंदला प्रामुख्याने मुस्लिम संघटनांचा पाठिंबा आहे. या बंदवर केंद्रीय गृहमंत्रालयाने विशेष लक्ष घातले आहे. सोबतच, एक सर्कुलर जारी करून या दरम्यान सोशल मीडियावर करडी नजर ठेवली जात आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा बंदला विरोध

दिल्लीसह विविध राज्यांमध्ये बंद पाळला जात असला तरीही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने बंदला विरोध केला आहे. त्यांच्या मते, विविध संघटना, पक्षांकडून अनेक प्रश्नांवर बंद व आंदोलन करण्यात येते. यात व्यापारी, उद्योजक, दुकानदार सर्वजण आपापले व्यापार व उद्योग बंद ठेवून सहभागी होतात. त्यामुळे राष्ट्राचे मोठे नुकसान होते. ग्राहकांचे हाल होतात.

म्हणाले, देशहित लक्षात घेऊन महाराष्ट्रात बंदला विरोध
 
व्यापारी, दुकानदार, उद्योजक नेहमी सहकार्याची भूमिका ठेवून बंद, आंदोलनात सहभागी होतात. मात्र यापुढे विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी पुकारलेल्या बंदमध्ये आपापले व्यापार, व्यवसाय बंद न ठेवता काळ्या फिती लावून सहभागी होऊन सहकार्य करतील, अशी घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले, गेल्या 5 वर्षांत व्यापारी, दुकानदार, उद्योजकांनी त्यांच्या स्वतःच्या मागण्यांसाठीसुद्धा अत्यंत कमी वेळाच बंद अथवा आंदोलने केली आहेत. त्यामुळे देशहित लक्षात घेता, भविष्यात होणाऱ्या कुठल्याही बंद अथवा आंदोलनात, व्यापारी व उद्योजक हे काळ्या फिती लावून सहभागी होणार असल्याचे मंडलेचा यांनी जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...