आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुस्तुम ए-हिंद, भारत केसरी मल्ल दादू चौगुले यांचे निधन, खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादू चौगुले आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फाइल फोटो - Divya Marathi
दादू चौगुले आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फाइल फोटो

कोल्हापूर - भारत केसरी तसेच रुस्तुम ए-हिंद पैलवान दादू चौगुले यांचे रविवारी निधन झाले. कोल्हापूरचे दादू यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होते. दादूंच्या निधनामुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. कुस्तीपटूंसाठी हा एक मोठा धक्का आहे.


देश-विदेशातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या पैलवानांना त्यांनी लाल मातीसह मॅटवर देखील चित केले. त्यांच्या कार्याबद्दल चौगुले यांना ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. आजही दादूंचे नाव आखाड्यांमध्ये मोठ्या सन्मानाने घेतले जाते. केवळ भारत केसरी आणि रुस्तुम ए-हिंदच नव्हे, तर राष्ट्रकुल आणि इतर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये देखील त्यांनी भारताचे नावलौकिक केले होते. त्यामध्ये 1973 मध्ये न्यूझीलंड येथे मिळवलेल्या 100 किलो गटातील रौप्यपदकाचा देखील समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...