आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारतरत्न’ संयुक्तपणे देण्यात यावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - असामान्य गायक मोहंमद रफी यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यांच्या खणखणीत व शक्तिशाली आवाजामध्ये गाण्याचे भाव एकरूप झालेले असायचे. परंतु किशोरकुमारची गाणी ऐकल्यानंतर असे वाटायचे की त्यांची गाण्याची कला मोहंमद रफींच्या तोडीस तोड व काही बाबतीत सरस होती. मस्ती, रोमान्स, प्रसन्नता, दर्द, विरह या जीवनातील सर्वच भावछटांना त्यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘समा है सुहाना सुहाना’ हे गाणे ऐकताना त्यांच्या आवाजाच्या कणाकणातून प्रसन्नतेची धुंदी प्रकाशमान होत असल्याचा अनुभव येतो. यॉडलिंग ही त्यांची स्वत:ची अशी गायनशैलीसुद्धा दाद देण्याजोगी आहे. तसेच विनोदी अभिनयाची त्यांची उपजत शैली म्हणजे क्रिएटिव्हीटीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. वर्षानुवर्षे गायनाचा रियाज केलेल्या गायकांना व अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या अनुभवी अभिनेत्यालाही हे साध्य होणार नाही. गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी उभ्या केलेल्या भावविश्वाला प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर साकारण्यामध्ये त्या काळातले दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री कमी पडलेले आहेत. असे त्यांनी आवाज दिलेले चित्रपट पाहिल्यावर जाणवते. म्हणून भारतरत्न द्यायचाच असेल तर मोहंमद रफी व किशोरकुमार या दोघांनाही संयुक्तपणे देणेच न्यायोचित ठरेल.