आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंचिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

...त्या वृद्ध महिलेला जेव्हा हे सांगण्यात आलं की,
तिचा नातू सलीम याचं ‘लिंचिंग’
झालंय तर तिला काहीच कळलं नाही.


तिच्या काळ्या,सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आणि अंधुकशा डोळ्यात कुठलेच भाव प्रकटले नाहीत.तिनं फाटक्या चादरीनं आपलं डोकं झाकलं.तिच्यासाठी ‘लिंचिंग’ शब्द नवा होता.पण तिला अंदाज आला होता की हा इंग्रजी शब्द आहे.यापूर्वीही तिनं काही इंग्रजी शब्द ऐकले होते जे तिला ठाऊक होते.तिनं इंग्रजीचा पहिला शब्द ‘पास’ ऐकला होता जेव्हा सलीम पहिल्या इयत्तेत पास झाला होता.दुसरा शब्द तिनं ‘जाॅब’ ऐकला होता. तिनं समजून घेतलं होतं की,जाॅब चा अर्थ नोकरी लागणे होय.तिसरा शब्द तिनं सॅलरी ऐकला होता.तिला ठाऊक होतं की सॅलरी चा अर्थ काय असतो ते.


हा शब्द ऐकला की तिच्या नाकाला तव्यावर भाजल्या जात असलेल्या भाकरीचा सुगंध येत असे.तिला अंदाज होता की इंग्रजी शब्द चांगले असतात आणि तिच्या नातवाबद्दलची ही एखादी चांगलीच खबर असावी.
वृद्धा समाधानी स्वरात म्हणाली, देव त्यांचं भलं करो!
पोरं अवाक् होऊन पाहू लागली,विचार करायला लागली की,
आजीबाईला लिंचिंगचा अर्थ  सांगावा की नको.त्यांच्यामध्ये एवढे धैर्य नव्हते की सांगू शकू का, की लिंचिंग काय असतं ते.
आजीबाईने विचार केला की,
एवढी चांगली बातमी  देणाऱ्या पोऱ्यांना आशीर्वाद तर अवश्य द्यायला हवेत.
ती म्हणाली, लेकरांनो,
देव करो आणि तुम्हा सगळ्यांचे लिंचिंग घडो,
थांबा हं..मी तुमचं तोंडच गोड करते कशी..!!

 

मूळ हिंदी कथा : असगर वजाहत
 

बातम्या आणखी आहेत...