आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मरक्षक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'हे काय करतोयस?' त्या अंधारकोठडीसमान खोलीत बसताच त्यानं सवाल केला.
'बाॅम्ब बनवतोय'
उत्तर ऐकून तो हबकलाच.
त्याला भयाण अस्वस्थता जाणवू लागली.
त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता.
'का चेष्टा करतोयस?'
'चेष्टा करत नाहीए....इकडे बघ,कितीतरी बाॅम्ब तयार झालेत'
प्रचंड आश्चर्याने त्यानं विचारलं,' पण याची गरजच काय तुला मित्रा?
तु तर धार्मिक वृत्तीचा आहेस.बहूतेक वेळ उपासनेत जातो तुझा,बऱ्याच  धार्मिक संघटनांशीही जोडला गेलेला आहेस'
'धर्मरक्षणासाठी!' 
त्याने शांत आणि सहज उत्तर दिलं.
'का?,धर्माला काय झालं?'
'धर्मशत्रूंच्या आक्रमणांच्या बातम्या पाहत किंवा वाचत नाहीस काय? 
त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय,
येत्या काळात मोठे संकट कोसळू शकते'
'परंतु याच्या वापराची धर्म परवानगी देतो?
...असं ऐकलंय की,कुठल्याही धर्मामध्ये हिंसेला मुळीच थारा नसतो'
'इतिहासात धर्मयुध्दाची कितीतरी उदाहरणं आहेत'
'धर्म एवढा कमकुवत झालाय का, ज्याच्या रक्षणासाठी रक्ताचे पाट वाहावे लागत आहेत..
....कदाचित धर्म रक्तपिपासू तर नसेल?'
'गप्प बस!' तो खवळला,'
धर्माला असे लांच्छन लावण्याची तुझी हिंमतच कशी झाली?'
'माझी तर असं म्हणण्याचीही हिंमत आहे की,ईश्वर हा भित्रा आणि दुबळासुद्धा आहे!.'
तो (या वाग्बाणाने) पुरता घायाळ झाला.
मात्र तो बेफिकिरी दाखवत राहिला.
' देव जर सर्वशक्तिमान असेल,तर तो स्वतःच धर्माचे दुश्मन का संपवत नाही?
का तुझ्यासारख्या सामान्य माणसाला माध्यम बनवतो तो?'
(मात्र) तो धर्म आणि ईश्वराविरुद्ध काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हता.
...निरुत्तर झाल्यानंतरची (त्याची) मनःस्थिती क्रोधात रूपांतरित झाली आणि त्याने त्याला अक्षरशः तिथून हाकलूनच लावले.
तो त्या बिचाऱ्या धर्मरक्षकाचे हिंस्र रूप पाहून हसत बाहेर आला.
...त्याने काही पावलांचेच अंतर कापले असेल तिथून,
तोच अचानक झालेल्या  स्फोटाच्या मोठ्या आवाजाने तो हादरून गेला.
मागे वळून पाहतो तर काय,
त्या धर्मरक्षकाच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या उडून हवेत तरंगत होत्या.
 परतीच्या वाटेवर  चालताना राहून राहून एकच प्रश्न त्याला सतावत होता,
तथाकथित धर्मरक्षक धर्माच्या नावावर शहीद झाला की
 रक्तपिपासू धर्माची तो शिकार झाला??

 

मूळ हिंदी कथा : मार्टिन जाॅन

बातम्या आणखी आहेत...