आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीर सावरकरांना तर दिलेच पाहिजे; बाळासाहेब ठाकरे यांनाही "भारतरत्न’ द्या; प्रवीण तोगडिया यांची मागणी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 'शाहीनबागेत मुस्लिमांची ढाल करून हिंदू जनजागरण करण्यात येत आहे'

नागपूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी भक्त आहे. त्यामुळे त्यांना तर भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे. पण, कोणीही पुढे येण्यास तयार नसतानाच्या काळात राम मंदिरासाठी ज्यांनी लढा उभारला, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, िवहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी येथे पत्रपरिषदेत केली.अगदी सुरुवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदू जनजागरण करत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरणनिर्मिती केली. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात यावा, असे तोगडिया म्हणाले. अयोध्येत राम मंदिर बांधताना त्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मारक बांधण्याची आठवण मीपणा करणाऱ्यांनी ठेवावी, असा टोला तोगडियांनी मोदींचे नाव न घेता लावला. मुस्लिमांची ढाल करून हिंदू जनजागरण शाहीनबागेत मुस्लिमांची ढाल करून हिंदू जनजागरण करण्यात येत आहे. कारण भाजप आता हिंदू जनजागरण करू शकत नाही, असा आरोप तोगडियांनी केला. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या घरी मुल्ला-मौलवींची बैठक झाल्यानंतर शाहीनबाग आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाच्या बदल्यात देशातील तीन कोटी बांगलादेशी घुसखोरांना अभय देण्यात आले, असा स्पष्ट आरोप तोगडियांनी केला. एनआरसी देशभर नाही, हे नरेंद्र मोदींचे वक्तव्य यातूनच आले आहे, असे ते म्हणाले. शाहीनबागच्या आडून हिंदुत्वाचे मार्केटिंग करण्यात येत असल्याचा आरोप तोगडियांनी केला. 
हिंगणघाट येथे तरुणीला जाळण्यात आल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. महिलांना संरक्षण आणि सुरक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. येथे १०० पैकी फक्त १८ दोषींना शिक्षा होते. हिंगणघाट येथील खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी तोगडियांनी केली. देशाची अर्थव्यवस्था आज ढासळली आहे. योग्य व्यक्तीच्या हातात अर्थव्यवस्थेची सूत्रे असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती, असे ते म्हणाले. भाजप सर्वांच्या दृष्टीने अस्पृश्य पक्ष होता. कोणीही जवळ करायला तयार नसतानाच्या काळात शिवसेनेने भाजपला साथ दिली. त्यामुळे शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मागितल्यानंतर भाजपने ते मोठ्या मनाने द्यायला हवे होते. ते न देऊन भाजपने चूक केली, असे ते म्हणाले.मला बाहेर का काढले हे सरसंघचालकांना विचारा  


हिंदुत्वाच्या चळवळीचे व्हायचे ते नुकसान होऊन गेले आहे. हिंदुत्वाची चळवळ उभारणाऱ्यांनीच चळवळीचे नुकसान केले, असा आरोप तोगडियांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव न घेता केला. चारित्र्य, कर्तृत्व, संघनिष्ठा यात मी कुठेच कमी नव्हतो. त्यामुळे मला का बाहेर काढले हे मोहन भागवतांना विचारा. संघ मुख्यालयात येऊन मी भागवतांना असे करू नका, अशी विनवणी केली. परंतु त्यांनी माझेच कोर्टमार्शल केले. बरे, माझ्या जागी दुसरा कोणी डायनॅमिक नेता आणला असता तर समजण्यासारखे होते, असे सांगतानाच संघाने इंटेशनली हिंदुत्वाची चळवळ संपवली, असा आरोप तोगडियांनी केला.बातम्या आणखी आहेत...