आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी टू' मोहीम नक्की काय हे समजून घ्या.. मगच आरोप करा....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - काही वर्षांपूर्वी जर सहमतीने घटना घडल्या असतील, तर त्याचा उपयोग करीत आता प्रस्थापितांविरुद्ध आराेप करण्यातून काय साध्य होणार आहे ? याचा विचार करावा. मी टू ही मोहीम नक्की काय आहे, हे समजून मगच आरोप करावेत, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले. दहा वर्षापूर्वी घडलेल्या घटनेवर आता भाष्य करीत आरोप होत असतील तर ही मोहीम तितकीच खरी आहे का जेन्युयन आहे काय? हेही तपासले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

 

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा समारोप कार्यक्रम भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते बक्षीस वितरणाने करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी टू मोहिमेचे लोण भारतापर्यंत पोहचले आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, 'मी टू म्हणजे एखाद्या माणसाची गरज होती, त्याचा उपयोग करून घेतला आणि चार वर्षानंतर तो नाही म्हणाला तर हे प्रकरण मी टू मध्ये जात नाही. एखादा माणूस फ्लर्ट करताना कळत होता, तेव्हा ते आवडत होते, आता तिसरी व्यक्ती आवडत असेल तर ते सुद्धा मी टू नाही. हॉलीवूडमध्ये जेव्हा घडले, व्यक्त झाले ते मी टू आपण डायल्यूट केले आहे. हॉलीवूडमधील सक्सेसफूल अॅक्ट्रेसेस या मी टू बद्दल बोलल्या, ते आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री बोलतात, ती मोहीम वेगळी असे मला वाटते.' पत्रकार परिषदेला सिंहगडचे सचिव संजय नवले, प्रा. रवींद्र देशमुख उपस्थित होते. 

सलमान खान, माधुरी दीक्षित, सचिन, लता मंगेशकर उगाच नाही होत.. त्या मागे असते प्रचंड मेहनत 


सलमान खान उगाच नाही होत. तो रोज साडेचार तास जीममध्ये काढतो. माधुरी दीक्षितला चक्कर मारून खाली बसायचे होते, असा एक फोटो काढायचा होता, ती १०९ वेळा चक्कर काढून खाली बसत होती. सचिन तेंडुलकरची सेंच्युरी दिसते. पण आपण पिचवर उभे राहून दाखवू शकतो का? हे तपासले पाहिजे. एक रन काढून दाखवा. मेहनत करण्याची तयारी असेल तर हे शक्य होते. युवा महोत्सवासारखे इव्हेंट घेणे म्हणूनच गरजेचे आहे. यातून हे कलाकार घडू शकतात, असे भार्गवी म्हणाल्या. 

 

 

बातम्या आणखी आहेत...