आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिपचे अार्थिक लूट थांबण्यासाठी धरणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गोरगरीब जनतेची नावे प्राधान्य क्रम यादीत टाकावीत, संजय गाधी, श्रावणबाळ, वृद्धपकाळ योजनेतील आर्थिक देवाणघेवाण थांबवावी या व अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी मागण्यांचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात अाले. 


विविध महामंडळ तसेच बँक मॅनेजर यांच्याकडून लाभार्थ्यांना होणारा मानसिक छळ व आर्थिक झळ थांबवावी, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे करावे यासह सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनी परत मिळाव्यात, जिल्हा हागणदारीमुक्त करावा या मागण्या या वेळी आंदोलकांतर्फे मांडण्यात आल्या. या अांदाेलनात प्रमोद इंगळे, बाळासाहेब पाटील, मच्छिंद्र सोनवणे, गणेश महाले, सुजाता ठाकूर, सुनीता बारी, युवराज झाल्टे, चेतन निंबाळकर, कविता सपकाळे, संगीता मोरे, अलका आरक, शेख जैनुल दस्तगीर यांच्यासह ५० नागरिक सहभागी झाले होते. अांदाेलकांनी निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना या वेळी मागण्यांचे निवेदन दिले. 

बातम्या आणखी आहेत...