आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती-हर्षच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण, हर्ष म्हणाला- 'दोन वर्षांनंतरही ही अशीच आहे, पण मला पसंत आहे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग आणि लेखक हर्ष लिम्बाचिया यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. 3 डिसेंबर 2017 रोजी गोव्यात मोठ्या थाटामाटात हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. या खास दिवसाचे औचित्य साधत भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या लग्नाचे खास फोटो शेअर करुन एकमेकांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षने त्यांच्या वेडिंग रिसेप्शनमधील एक फोटो शेअर करुन त्याला मजेशीर कॅप्शन दिले. हर्ष म्हणला, 'दो साल बाद भी ये ऐसी ही है , पर मुझे पसंद है ❤️❤️❤️'

दुसरीकडे भारतीनेही लग्न आणि वेडिंग रिसेप्शनच्या छायाचित्रांचा कोलाज शेअर करुन हर्षसाठी खास मेसेज लिहिला आहे. भारती म्हणते, ''हॅपी अॅनिव्हर्सरी माय सोलमेट... सगळ्यासाठी तुला धन्यवाद.. हर्ष मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यातील एका क्षणाचाही विचार करु शकत नाही, माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि मला हेदेखील ठाऊक आहे की,  माझ्यापेक्षाही तू माझ्यावर जास्त प्रेम करतो. तू मला छोट्याशा बाळाप्रमाणे सांभाळतो आणि माझा प्रत्येक हट्ट पुरवतो. सात जन्मासाठी नव्हे तर प्रत्येक जन्मासाठी तुच माझा पती व्हावा, अशी मी देवाकडे प्रार्थना करते.''