आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Khatron Ke Khiladi 9 : पतीला Kiss करण्याचा प्रयत्न करत होती भारती, पण तेव्हा होस्ट रोहित शेट्टी जे म्हणाला ते ऐकून जोरजोरात ओरडली : VIDEO

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कॉमेडियन भारती सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती पती हर्ष लिम्बचियाला Kiss करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तेव्हाच रोहित शेट्टी तिला थांबवतो आणि म्हणतो, "तू पप्पी घेऊ शकतेस हर्षची...हा हर्ष नाही, दुसरा एक हर्ष येत आहे" आणि तेव्हा तिथे एका प्राण्याला आणले जाते. ज्याला पाहून भरती खूप घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते. एवढेच नाही, तर रोहित शेट्टी तिची हालत पाहून खूप हसतो. 

 

'खतरों के खिलाड़ी'चा प्रोमो आहे हा व्हिडीओ.... 
- भारतीने जो व्हिडीओ शेयर केला आहे, तो 'खतरों के खिलाड़ी सीजन 9' चा प्रोमो आहे. रोहित शेट्टी या शोला होस्ट करत आहे तर भारती आणि हर्ष कन्टेस्टंट्स आहेत. एक स्टंट म्हणून रोहित शेट्टी तिला एका जनावराला Kiss करायला सांगतो. 'खतरों के खिलाड़ी' चे नवे सीजन 5 जानेवारीपासून सुरु झाले आहे. यामध्ये भारती आणि हर्ष व्यतिरिक्त, श्रीसंत, अविका गौर, विकास गुप्ता, शमिता शेट्टी, आदित्य नारायण आणि पुनीत पाठक सह काही अन्य सेलेब्रिटींनीही पार्टिसिपेट केले आहे.