आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन भारती सिंहला झाला हा आजार, तरीही काम करताना घेणार नाही ब्रेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. गेल्या महिन्यात कॉमेडियन भारती सिंह 2 वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. पहिले तिला डेंग्यू झाला होता, यामुळे तिला एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. यानंतर तिला लिगामेंट सर्जरीचा सामना करावा लागला. ती अजुनही पुर्णपणे बरी झालेली नाही. तरीही ती काम करत आहे. आम्ही तिच्यासोबत बातचित केली. यावेळी तिने कामातून ब्रेक का घेणार नाही याचे कारण सांगितले. 

 

या आजाराचा सामना करतेय भारती 
भारतीने सांगितले, "मला दमा आहे. हा सुरुवातीच्या स्टेजवर आहे आणि हा आजार जास्त वाढू नये याची मी खुप काळजी घेत आहे. याचे संकेत पहिलेच दिसत होते, पण मी सीरियस घेतले नव्हते. मी लवकर थकत होते. मला वाटले की, हे हेक्टिक शेड्यूलमुळे होत असेल. पण नंतर मला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. नंतर मी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि मला दमा असल्याचे कळाले. आता ट्रीटमेंट सुरु झाली आहे."


मला अजूनही वेदना होत आहेत 
भारती म्हणते की, "खतरो के खिलाडीच्या शूटिंगसाठी मी अर्जेटीना येथे गेले होते. तिथून आल्यानंतर तब्येत बिघडणे सुरु झाले. अचानक क्लायमेट चेंज झाल्यामुळे आणि पोल्यूशनमुळे मला ताप आला आणि नंतर डेंग्यू झाला. यामुळे मी 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. हळुहळू मी बरी झाली आणि काम सुरु केले. 'बिग बॉस'व्यतिरिक्त मी दूसरे प्रोजेक्ट शूट केले. 20 दिवसांनंतरच मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. यावेळी लिगामेंट सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागले. ऑपरेशनला एक आठवडा झाला आहे. तरीही मला वेदना सुरुच आहेत."


'मी अनप्रोफेशनल होऊ शकत नाही'
"हेक्टिक शेड्यूलमुळे माझ्या आरोग्याला खुप नुकसान झाले आहे. कधी-कधी कामामुळे मी फक्त 3-4 तासच झोपते. पण मी यावर काहीच करु शकत नाही. मला काही प्रोजेक्ट्स आहेत, हे मी पहिलेच साइन केले होते. मी ते सोडू शकत नाही. अनेक लोक माझ्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबत मी अनप्रोफेशनल होऊ शकत नाही. लाइफच्या या फेजमध्ये मला सपोर्ट मिळत आहे, यासाठी मी खुप आभारी आहे."

 

'द शो मस्ट गो ऑन'
भारती पुढे म्हणाली - "इंडियाज गॉट टॅलेंट"साठी 24 अक्टोबरला शूटिंग सुरु करेल. पण प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी करु शकणार नाही. तरीही माझे बेस्ट देण्याचे प्रयत्न करेल. यासोबतच चॅट शोवर काम सुरु करायचे आहे. हा शो माझे पती हर्ष लिंबाचिया प्रोड्यूस करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...