आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bharti Singh's Husband Harsh Limbachya Gifted Her An Expensive Watch On Her 33rd Birthday

भारती सिंहला 33 व्या वाढदिवसासाठी पती हर्षने लग्झरी घड्याळ केले गिफ्ट, 15 लाख रुपये असू शकते किंमत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कॉमेडियन भारती सिंहने 3 जुलैला आपला 33 वा बर्थडे साजरा केला. यानिमित्ताने तिचा पती हर्ष लिम्बचियाने तिला एक घड्याळ गिफ्ट केले, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीने कॅप्शनमध्ये लिहिले, "खूप खूप धन्यवाद आणि प्रेम हर्ष लिम्बचिया." भारतीने यासोबतच स्वत्झरलँडची लग्झरी वॉच कंपनी रोलेक्सला टॅग केले आहे.  

 

घड्याळाची किंमत 15 लाख रुपयांच्या जवळपास आहे... 
भारतीने घड्याळाचा जो फोटो शेअर केला आहे, त्याची किंमत 12 लाख रुपयांपसुन 15 लाख रुपयांच्या मध्ये आहे. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर या डिजाइनचे घड्याळ तीन साइजमध्ये उपलब्ध आहे. 28 mm, 31 mm आणि 36 mm. तिन्ही साइजची किंमत अनुक्रमे 1232900, 1355400 आणि 1468400 रुपये दाखवली जात आहे. याची माहिती उपलब्ध नाही कि हर्षने कोणत्या साइजचे घड्याळ भारतीला गिफ्ट केले आहे.  

 

एका आठवड्यापूर्वी हर्षने कापायला लावला होता केक... 
भारतीच्या वाढदिवसाच्या एक आठवडा आधीच हर्षने शो 'खतरा खतरा खतरा'च्या सेटवर तिला केक कापायला लावला होता. तेव्हा तो म्हणाला होता की, त्याला भारतीला सरप्राइज द्यायला आवडते. हर्षने हा संकेतदेखील दिला होता की, यावर्षी बर्थडेला भारतीला एक सरप्राइज तो देणार आहे.