आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर अॅपला न्यूज अॅप ऑफ द इयर अवाॅर्ड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाेपाळ : दैनिक भास्कर समूहाच्या अॅपचा न्यूज अॅप ऑफ द इयर अवाॅर्डने गाैरव करण्यात आला. जाहिरात, डिजिटल मीडिया, मार्केटिंग विश्वातील एफेक्सने (एएफएक्यूएस) गुरुवारी सायंकाळी गुरगाव येथे आयाेजित तिसऱ्या डिजिपब पुरस्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान केला. सर्वात वेगवान बातम्या, घटना-घडामाेडींचे स्पष्ट विश्लेषण, प्रत्येक वयाेगटातील वाचकांना सातत्याने अपडेट करण्याची शैली, अॅपचे ले-आऊट, सहज नेव्हिगेशन, न्यूज ब्रीफ, ऑडिओ-व्हिडीओ बुलेटिन इत्यादी प्राॅपर्टीज व ओरिजिनल कंटेंट यामुळे भास्कर अॅपला भारतीय भाषेच्या श्रेणीत हा सन्मान मिळाला. पुरस्काराबद्दल काेट्यवधी वाचक तसेच डिजिटल मीडिया, हिंदीतील भास्करची ताकद समजून घेतल्याबद्दल भास्करने आभार व्यक्त केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...