आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लुझिव्ह : व्याप्त काश्मिरात पाक लष्कर भारताशी युद्धाच्या तयारीत; पीओकेच्या दाना सेक्टरसह सर्व भागात पाकचे ब्रिगेडही तैनात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - भारताने जम्मू-काश्मीरातून कलम ३७० हटवल्यानंतर भारत-पाकिस्तानच्या संबंधात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला हाेता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभरात काश्मीरप्रश्नी कूटनीतीच्या पातळीवर मदतीसाठी अपील करत आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने गुपचूप पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. 

बालाकाेट हल्ल्याच्या घटनेतून धडा घेताना लष्कर पूर्वीच्या तुलनेत अधिक सजग राहून रणनीती तयार करण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळेच ३७० कलम हटवल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच पाकिस्तानचे सैन्य नियंत्रण रेषेवर पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाल्याचेही दिसून येत आहे. विश्वस्त सूत्रांच्या मते पाकिस्तान लष्कर भारतासाेबत छाेट्या युद्धाच्या तयारीला लागले आहे. पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी काश्मीरमध्ये ‘स्टेटस काे’ बदलल्यानंतर सैन्याला उत्तर देण्याची रणनीती आखू लागले आहेत. पाक सैन्याचे एक कमांडिंग अधिकारी पीआेकेतील दाना सेक्टरमध्ये तैनात आहेत. सध्याची स्थिती युद्धापेक्षा निश्चितपणे कमी नाही.  एलआेसीजवळ दारुगाेळा व युद्धसामग्री गाेळा करण्याचे काम केले जात आहे. सामग्री गाेळा करण्याची पद्धत सामान्य नाही. संपूर्ण परिस्थती पाहिल्यास एखादे अल्प काळाचे युद्धदेखील हाेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

सैन्याचे ६ ब्रिगेड एकत्र 
पाकिस्तान लष्कराच्या एका अन्य उच्चस्तरीय सूत्रानुसार एलआेसीच्या प्रत्येक क्षेत्रात सैन्याचे ६ ब्रिगेड एकत्र येत आहेत. सैन्याचे मुख्य लक्ष दाना व वाघा सेक्टरमध्ये आहे. कारण सामरिक व रणनीतीच्या दृष्टीने हे क्षेत्र खूप महत्त्वाचे मानले जाते.
 

पाकचे डावपेच : भारतीय सैन्याला नीलम नदी क्षेत्रात अडवण्याचे प्रयत्न
एलआेसीवर तैनात सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काेणत्याही प्रकारे भारतीय सैन्याने आॅक्टाेबरपूर्वी नीलम नदी पार करावी. तसे झाल्यास बर्फवृष्टीनंतर पाेझिशनला हाेल्ड करणे भारतीय सैन्यासाठी खूप महागडे ठरू शकते. अशा स्थितीत भारतीय सैन्य मागे हटल्यास किंवा हटले नाही तरी दाेन्ही स्थितीत भारताचे नुकसान हाेणार आहे, असा पाकिस्तानचा डाव आहे. दुसरीकडे मात्र आयुधांची जमवाजमव वाढू लागली आहे. हे वास्तव आहे. काहीही घडले तरी ते आॅक्टाेबरपर्यंत व्हायला हवे, अन्यथा एप्रिल २०२० पर्यंत जैसे थे स्थिती राहू शकते. 
 

बर्फवृष्टीच्या आधी युद्धाची तयारी
भारताचा आम्हाला नीलम नदीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न :  पाक सैन
्य
पाकिस्तान सैन्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले, कधी युद्ध सुरू होईल सांगता येत नाही; परंतु  भारत आणि पाक सैन्य युद्धासाठी तयार आहे.  जे काही घडेल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये. कारण नंतर बर्फवर्षामुळे युद्ध करणे सोपे नाही. पाक सैन्याच्या माहितीनुसार भारत बर्फवृष्टीच्या आधी पाक सैन्यास नीलम नदीच्या पलीकडे हाकलणार आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढील उन्हाळ्यापर्यंत अशाच स्थितीत राहावे लागेल. पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे झाले तर सैनिक याला विरोध करतीलाक या वेळी चर्चा नाही करणार, कारण चर्चा आणि कायदेशीर बाबी आता निरुपयोगी झाल्या आहेत.
 

इम्रानच्या वक्तव्यामुळे शक्यता बळावली 
सैन्याने युद्धासाठी अगोदरच तयारी सुरू केल्याचा पाक जाणकारांचा दा
वा 
२१ आॅगस्ट राेजी न्यूयाॅर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खानने काही गाेष्टी स्पष्ट केल्या. आता भारतासाेबत चर्चा करण्यासारखे काहीही शिल्लक नाही, असे पाक पंतप्रधानांनी म्हटले हाेते. सामरिक तज्ञांच्या मते इम्रान खान यांच्या या वक्तव्यावरून पाक सैन्य आता चर्चा नव्हे, युद्धाच्या तयारीला लागले आहे. ‘दिव्य मराठी’ शी बाेलताना पत्रकार नुसरत जावेद म्हणाले, पाकिस्तान पुढे येऊन प्रकरणाला हवा देणार नाही. परंतु भारताच्या कारवायांना ताेंड देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पाकचे कमीत कमी नुकसान हाेईल, असे जावेद यांनी सांगितले. पत्रकार कामरान खान प्रांतीय राजकारणाकडे बारकाईने पाहतात. 
 

भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्यास तयार : बाजवा
पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा यांनी सांगितले की, पाक सैन्य भारताच्या रणनीतीवर लक्ष ठेवून आहे. भारताच्या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला उत्तर देण्यास आमचे सैन्य तयार आहे. शनिवारी गिलगिट येथे सैन्य मुख्यालयामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. १९ ऑगस्ट रोजी बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे इम्रान यांना विरोधकांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते.  
 

काही दिवसांपूर्वीच बाजवा यांची कारखान्यास भेट  
लष्कर प्रमुख बाजवा यांनी काही दिवसांपूर्वीच आयुध कारखान्यास भेट दिली होती. कंपनी सूत्रानुसार बाजवा यांचा दौरा पूर्वनियोजित होता. तेथे त्यांनी काही तास थांबून तेथील उत्पादनाची आकडेवारी केली.