Ground Report / भास्कर ग्राउंड रिपोर्ट : जम्मू-काश्मिरात दर १६ जणांमागे १ जवान तैनात, सीआरपीएफच्या ४० कंपन्या दाखल

जम्मूत एक दिवस आधीच कलम - १४४ लागू करण्यात आले होते. रस्ते आणि गल्लीबोळातही सन्नाटा होता. मात्र, कुठेही स्थिती बिघडल्याचे वृत्त आले नाही. जम्मूत एक दिवस आधीच कलम - १४४ लागू करण्यात आले होते. रस्ते आणि गल्लीबोळातही सन्नाटा होता. मात्र, कुठेही स्थिती बिघडल्याचे वृत्त आले नाही.

जम्मू-काश्मिरात सुमारे ७.७८ लाख लष्करी, निमलष्कर दल आणि राज्य पोलिसांचे जवान तैनात

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 06,2019 09:25:00 AM IST

जम्मू-श्रीनगर - गृहमंत्री अमित शहा हे संसदेत जम्मू-काश्मिरातून कलम-३७० हटवण्याच्या मुद्द्यावरच चर्चा करत असताना दुसरीकडे राज्यात लष्कर व पोलिस जवान कडेकोट बंदोबस्त देत होते. एका अंदाजानुसार राज्यात सुमारे ७.७८ लाख लष्करी, निमलष्करी व राज्य पोलिसांचे जवान तैनात आहेत. राज्याची एकूण लोकसंख्या सुमारे १.२५ कोटी आहे. या हिशेबाने राज्यात दर १६ जणांमागे १ जवान तैनात आहे. राज्यात रविवारी मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू झाले. बाहेरून आलेले पर्यटक जम्मूत अडकले आहेत. रस्ते सुनसान आहेत. मात्र, जम्मू व लडाखमध्ये लोक ढोल-नगाऱ्यांसह जल्लोष करत आहेत. मोबाइल व इंटरनेट सेवा बंद होत्या. शाळा-महाविद्यालये बंद, तर परीक्षा रद्द झाल्या आहेत. सर्व भागांत लष्करी व निमलष्करी जवान तैनात आहेत. जम्मूत सीआरपीएफच्या ४० कंपन्या पाठवल्या आहेत. तथापि, लडाखमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर मंगळवारी शाळा उघडतील.

लोकांना अंदाज आला होता की, काही तरी मोठं घडणार आहे; केंद्राची घोषणा होताच विजयी मिरवणुका निघाल्या

जम्मूत एक दिवस आधीच कलम -१४४ लागू आहे

जम्मूहून मोहित कंधारी - जम्मू-काश्मिरातील रस्तेच काय, पण गल्लीबोळातही सन्नाटा होता. संपूर्ण जम्मूत एक दिवस आधीच कलम-१४४ लागू करण्यात आले होते. सोमवारी सकाळपासूनच वाढत्या हालचाली काही तरी होणार असल्याचे सांगत होत्या. संवेदनशील भागात निमलष्करी जवानांनी रहदारीचे रस्ते तारांनी अडवले होते. संपूर्ण जम्मू भागात जिल्हा प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्था बंद केल्या होत्या. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित राज्य घोषित केल्यानंतर येथील सर्वसामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. जम्मू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसच्या आतच कार्यक्रम आयोजित करून जल्लोष साजरा केला. विद्यार्थ्यांनी कलम - ३७० आता इतिहास आहे, अशा घोषणा लिहिलेल्या फलकांसह विजयी मिरवणुका काढल्या. दरम्यान, जम्मू-काश्मिरातील ज्येष्ठ
वकील शेख शकील म्हणाले की, जर भारत सरकार हा निर्णय जम्मू-काश्मिरातील लोकांच्या हिताचा आहे, असे सांगत असेल तर मग लोकांना जल्लोष का करू देत नाही? असे करून भाजप सरकारने संविधानाची मोठी थट्टा केली आहे.

लडाख : सर्व सेवा सुरळीत, जल्लोष करत लोक म्हणाले, विधानसभा मिळाली असती तर जास्त चांगले झाले असते

जम्मूत एक दिवस आधीच कलम -१४४ लागू आहे

लडाखहून मोरूप स्टँजिन - लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्याची वार्ता कळताच येथील कारगिल आणि लेह या दोन जिल्ह्यांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. लेहमधील नेते, धार्मिक नेते आणि स्थानिकांत आनंदाची लहर आहे. दुसरीकडे, कारगिलमध्ये काही प्रमाणात असंतोष आहे. लेहमधील प्रमुख बाजारपेठांत भाजप, माजी खासदार व स्थानिकांनी गात-नाचत आनंद साजरा केला. हा भाग केंद्रशासित प्रदेश झाल्याबद्दल लोक एकमेकांचे अभिनंदन करत होते. लडाखच्या एकूण अडीच लाख लोकसंख्येपैकी सव्वा लाख नागरिक लेह जिल्ह्यात राहतात. भूभागानुसार हा देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जम्मू आणि काश्मीरप्रमाणे येथे ना इंटरनेट बंद झाले ना टेलिफोन. मात्र, आपल्याला विधानसभाही मिळाली असती तर आणखी चांगले झाले असते, असे येथील लोकांना वाटते. काश्मिरातील स्थिती सुधारल्यानंतर केंद्र सरकारकडे याची मागणी करू, असे ते सांगतात. लेहमधील दॉरजे आंगला वाटते की आजवर त्यांच्यासाठीचे निर्णय काश्मिरात व्हायचे. यामुळे त्यांना काहीच मिळायचे नाही. आता त्यांचे निर्णय भारत सरकार करेल.

X
जम्मूत एक दिवस आधीच कलम - १४४ लागू करण्यात आले होते. रस्ते आणि गल्लीबोळातही सन्नाटा होता. मात्र, कुठेही स्थिती बिघडल्याचे वृत्त आले नाही.जम्मूत एक दिवस आधीच कलम - १४४ लागू करण्यात आले होते. रस्ते आणि गल्लीबोळातही सन्नाटा होता. मात्र, कुठेही स्थिती बिघडल्याचे वृत्त आले नाही.
COMMENT