MahaElection / राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा; मातोश्रीवर केला शिवसेनेत प्रवेश

औरंगाबादेत विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला राजीनामा, तत्काळ मंजूरही करण्यात आला
 

दिव्य मराठी वेब

Sep 13,2019 02:23:13 PM IST

औरंगाबाद - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. अशातच कोकणातील मातब्बर नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज दुपारी मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.

भास्कर जाधव यांनी औरंगाबादेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बागडेंनी जाधव यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचेय स्वीय सहायक व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीत आपल्या कर्तृत्वाला वाव मिळत नसल्याची जाधवांची भावना

भास्कर जाधव पूर्वी शिवसेनेतच होते. मात्र पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री देखील होते. मात्र आपल्या कर्तृत्वाला राष्ट्रवादीत फारसा वाव मिळत नसल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

X
COMMENT