आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे आतापर्यंत ३८ प्रयत्न, ५२ टक्केच यशस्वी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - चंद्राला स्पर्श करण्याचा पहिला प्रयत्न १९५८ मध्ये अमेरिका व सोव्हियत संघाने केला होता. ऑगस्ट ते डिसेंबर १९६८ दरम्यान  दोन्ही देशांनी ४ पॉयनियर आिर्बटर (अमेरिका) आणि ३ लुना इम्पॅक्ट (सोव्हियत संघ) पाठवले. मात्र, यशस्वी झाले नाहीत. आतापर्यंत चंद्रावर जगातील फक्त सहा देश किंवा संस्थांनी सॅटेलाइट पाठवले. यश फक्त पाचला मिळाले आहे. आतापर्यंत असे ३८ प्रयत्न झाले, यातील ५२ टक्केच यशस्वी.

रशिया : १७ वर्षांत एकूण २४ प्रयत्न केले, यातील १५ यशस्वी राहिलेे
१९५९ ते १९७६ दरम्यान सोव्हियत संघ रशियाने २४ प्रयत्न केले, यातील १५ यशस्वी. कोणात आर्बिटर, कोणात लँडर होते. १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाचे लुना २ मिशन चंद्रावर पोहचणारे पहिले मिशन होते. लुनाच्या दोन मोहिमा चंद्रावरून नमुने घेऊन परतल्या होत्या. लुना १७ व लुना २१ मिशनने चंद्रावर रोव्हर उतरवण्यात यश मिळवले.

अमेरिका : १९ मोहिमा केल्या, २४ अंतराळवीरही चंद्रावर पोहोचले
नासाच्या सव्र्हेअर कार्यक्रम अंतर्गत जून  १९६६ ते जानेवारी १९६८ दरम्यान  ७ वेळा रोबोटिक स्पेसक्राफ्ट चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी राहिले. नासाच्या अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ दरम्यान  १९ प्रयत्न झाले, १६ यशस्वी राहिले. या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँगसह २४ अंतराळवीरही चंद्रावर पोहचले.

जपान : पहिली मोहीम अयशस्वी झाली, नंतर १७ वर्षांनंतर यश मिळाले
जपानने २४ फेब्रुवारी १९९० रोजी पहिली चंद्र मोहिम ‘हितेन-हागोरोमो’ लाँच केली. अार्बिटरने चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर काही काळात जमिनीपासूनचा संपर्क तुटला. जपान एयरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने ४ सप्टेंबर २००७ रोजी ‘कागुया’ लाँच केली. जी ३ ऑक्टोबरला चंद्राच्या कक्षेत पोहचली. अपोलो मोहिमेनंतर ही चंद्रावरील सर्वात मोठी मोहिम होती.

चीन : ४ मोहिमा, सर्व यशस्वी, युतू चंद्रावर १० किमी चालले
चीनच्या चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने मून मिशन चेंग सिरिजमध्ये २००७ पासून आतापर्यंत ४ प्रयत्न केले, सर्व यशस्वी. चेंग-१ आणि चेंग- २ मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चेंग ३ व चेंग ४ मध्ये लँडर होते. यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते. चेंग ३ (१२०० किलो) लँडरने चीनमधून १ डिसेंबर २०१३ रोजी उड्डाण केले आणि १४ डिसेंबर रोजी चंद्रावर उतरले.

भारत : पहिल्या प्रयत्नात यश, पाचवा देश झाला
भारताचे चंद्रयान-१ (१३८० किलो) २२ अॉक्टोबर २००८ रोजी पीएसएलव्ही सी -११ राकेटद्वारा श्रीहरीकोटाहून पाठवण्यात आले. यात ११ उपकरणे होती. याची मुदत २ वर्ष होती. मात्र, ते १० महिने सहा दिवसच सक्रिय राहिले.

युरोपियन स्पेस
युरोपच्या युरोपियन स्पेस संस्थेने स्मार्ट - १ आर्बिटर/ इम्पॅक्ट प्रोब २७ सप्टेंबर २००३ रोजी लाँच केले.

बातम्या आणखी आहेत...