• Home
  • National
  • Bhaskar Original: Border Bunker School; When the children sing the national anthem, the voice can be heard till Pakistan

Live Report / भास्कर Original : सीमेवरील बंकर शाळा; मुले जेव्हा राष्ट्रगीत गातात, तेव्हा आवाज पाकिस्तानपर्यंत ऐकू जातो...

शाळेच्या सर्व भिंतींवर पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात. शाळेच्या सर्व भिंतींवर पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात.
शाळेच्या बेसमेटमध्ये बंकर बनवले आहे. तेथेच वर्ग चालतात. शाळेच्या बेसमेटमध्ये बंकर बनवले आहे. तेथेच वर्ग चालतात.

आरएसपुरा सेक्टरच्या या शाळेचे अंगण पाकच्या तोफगोळ्यांनी भरून जाते, म्हणून बंकर तयार केले 

Sep 05,2019 07:52:00 AM IST

भारत-पाक सीमवेर अलीकडेच एक शाळा सुरू झाली आहे, ती थेट झीरो लाइनवर आहे. आरएसपुराच्या या माध्यमिक शाळेत पहिली ते ८ वीचे शंभराहून जास्त विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांना रोज कसरत करावी लागते. ही मुले रोज सकाळी गुरे चारण्यासाठी, दूध विकण्यासाठी जातात. शिक्षक त्यांना शोधून, समजावून शाळेत आणतात. गुड माॅर्निंग मास्टरजी असे म्हणत मुले शाळेत प्रवेश करतात. नंतर मुले जेव्हा राष्ट्रगीत गातात तेव्हा त्यांचा आवाज पाकिस्तानपर्यंत पोहोचतो. सीमेजवळ असल्याने या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता असते. शिक्षकांनी पदरमोड करून शाळेच्या भिंती उभ्या केल्या आहेत. १९९६ पूर्वी येथे शाळा नव्हती. आज पक्की इमारत आहे, तिच्या भिंतीवर पाकिस्तानी गोळ्यांच्या खुणा आहेत. मुख्याध्यापकांच्या प्रयत्नामुळे काही दिवसांपूर्वी शाळेत बंकर तयार केले आहे. जेव्हा सीमेवर तणाव असतो, तेव्हा ८ -१० तोफगोळे येथे पडतात, असे लोक सांगतात.

आरएसपुरा सेक्टरच्या या शाळेचे अंगण पाकच्या तोफगोळ्यांनी भरून जाते, म्हणून बंकर तयार केले

X
शाळेच्या सर्व भिंतींवर पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात.शाळेच्या सर्व भिंतींवर पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात.
शाळेच्या बेसमेटमध्ये बंकर बनवले आहे. तेथेच वर्ग चालतात.शाळेच्या बेसमेटमध्ये बंकर बनवले आहे. तेथेच वर्ग चालतात.