आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhaskar Pedia War Of Aricka Between Peru And Chile

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅरिकाची लढाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅरिकाची लढाई प्रशांत महासागरात चिली व पेरू सैनिकांत 7 जून 1880 रोजी झाली. टेक्नाच्या लढाईनंतर बोलिव्हियाने या युद्धातून माघार घेतल्यानंतर पेरू एकटा पडला होता. चिली त्या वेळी महासागरात आपल्या सैनिकांसाठी बंदराच्या शोधात होता. त्याच वेळी अ‍ॅरिका बंदराची कुणकुण लागली. हे बंदर पेरूचे मजबूत ठाणे समजले जात होते. चिली सैनिकांनी कर्नल पेड्रो लागोसच्या नेतृत्वाखाली हल्ला करून ते ताब्यात घेतले. या लढाईत पेरू सैनिकांचा कमांडर फ्रान्सिस्को बोलाग्वेसीसह एक हजारपेक्षा जास्त सैनिक मारले गेले. चिलीच्या या विजयाबरोबरच टेक्ना व अ‍ॅरिका कॅम्पेनचा अंत झाला. तारापाका व टेक्ना प्रांतासह मोठा भाग ताब्यात आला. त्यानंतर लिमा कॅम्पेन नावाने युद्धाला प्रारंभ झाला. त्याचा परिणाम म्हणजे सात महिन्यांनंतर पेरूच्या राजधानीचे पतन झाले.