आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमाने तरुणीला दिल्या आयुष्यभराच्या वेदना; संपूर्ण शरीरावर पट्ट्या, बोलताही येत नाही; लिहून म्हणते, मला पूर्वीसारखी करा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला सिटी - चंदीगडच्या सेक्टर-32 चा दुसरा मजला. येथे बर्न युनिटमध्ये अॅसिड अटॅक पीडित कवितावर उपचार सुरू आहेत. तिच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर पट्ट्या लावल्या आहेत. श्वास घेता येत नसल्याने ऑक्सिजन मास्कही लावण्यात आला. काहीच खाऊ शकत नाही. त्यामुळे, नाक आणि गळ्यात फूड पाइप लावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या तरुणीला बोलता देखील येत नाही. अजुनही तिच्या त्वचेवर अॅसिड हल्ल्याच्या वेदना शमलेल्या नाहीत. या हल्ल्यातून ती इतकी घाबरली आहे, की तिच्या वार्डमध्ये पायांच्या हालचाली सुद्धा झाल्यास ती घाबरून उठते. युनिटमध्ये अख्खा कुटुंब तिच्या शेजारीच बसला आहे. अशात बुधवारी दैनिक भास्करच्या टीमने तिची भेट घेतली. तिला खूप काही सांगायचे आहे. परंतु, बोलताच येत नाही. एका कागदावर लिहून ती विनंती करत आहे, की कृपया मला वाचवा आणि पूर्वीसारखी करा.


दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार
पोलिसांनी अॅसिड हल्ल्यातील तीन आरोपींपैकी अरुण आणि नितीन या दोघांना अटक केली. तर तिसरा आणि मुख्य आरोपी मोती सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याची संपूर्ण हिस्ट्री काढली असून ठिक-ठिकाणी धाडसत्र राबवले जात आहे. परदेशात फरार होण्याची भीती असल्याने पोलिसांनी सर्वच विमानतळावर हायअॅलर्ट जारी केला आहे. मुख्य आरोपी लवकरच पकडला जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.


आणखी 10 शस्त्रक्रिया काव्या लागणार
कविताचा चेहरा, शरीर आणि पायावर अॅसिड हल्ल्याच्या कायमच्या जखमा आहेत. या हल्ल्याचा इतका वाइट परिणाम झाला की त्याचे डाग कधीच जाणार नाहीत. आईने सांगितल्याप्रमाणे, डॉक्टर कवितावर आणखी 10 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करणार आहेत. डोळ्यावर काही शस्त्रक्रिया यापूर्वीच झाल्या. तर अजुनही इतर ऑपरेशन बाकी आहेत. त्याचा एक डोळा जवळपास वाया गेला आहे. अॅसिड आतपर्यंत गेल्याने शरीरात कोणता अवयव किती टक्के निकामी झाले याच्या चाचण्या सुरूच आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, ती 35 टक्के भाजली आहे. सुरुवातीला ती गर्भवती असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, मेडिकल रिपोर्टमध्ये तसे काहीच आले नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार झेपावत नाही. ते आता सरकारकडे मदतीची विनंती करत आहेत. 


तीन वर्षांपूर्वी दिला लग्नास नकार
कविताच्या आईने सांगितल्याप्रमाणे, तीन वर्षांपूर्वी मोती त्याच्या कुटुंबियांसह कवितासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन घरी पोहोचला होता. परंतु, कविता आणि तिच्या पालकांनी या प्रस्तावास नकार दिला. या घटनेच्या वर्षभरानंतर कविताचा दुसऱ्या एका युवकाशी विवाह झाला. मोतीने सुद्धा एका तरुणीशी विवाह केला होता. या लग्नाच्या दोन वर्षांनंतर मोतीने दोन भाड्याचे हल्लेखोर बोलावले आणि तिच्यावर अॅसिड हल्ला केला. मोती नेहमीच मलेशिया-हाँगकाँगला जात असतो. पोलिसांनी पकडण्यापूर्वीच तो देश सोडून जाऊ नये. त्याला पकडा आणि कठोरातील कठोर शिक्षा द्या अशी मागणी आई करत आहे.

बातम्या आणखी आहेत...