आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयएम-एच्या विद्यार्थ्यांना भास्कर देणार स्कॉलरशिप, पाच कोटी रुपयांचा निधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - डीबी कॉर्प लिमिटेड आपले चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ आयआयएम अहमदाबादमध्ये “दैनिक भास्कर मेरिट अँड मीन्स स्कॉलरशिप’ सुरू करेल. यासाठी दहा वर्षांत पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. या योजनेनुसार, आयआयएम अहमदाबादच्या एमबीए/ एमबीए-एफएबीएमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. आयआयएम अहमदाबाद अनेक वर्षांपासून भारत व आशिया-प्रशांत विभागात बेस्ट मॅनेजेमेंट संस्थांमध्ये पहिल्या १० मध्ये आहे.दैनिक भास्कर समूह भारतातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह आहे. समूहाचे एमडी सुधीर अग्रवाल यांनी सांगितले, “आमचे चेअरमन व माझे वडील रमेशचंद्र अग्रवाल दूरदृष्टीचे व मूल्य सांभाळून जगणारे व्यक्ती होते. आपल्या शैलीने त्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले. समाजाकडून जे काही मिळेल ते समाजाला परत दिले पाहिजे, या त्यांच्या सिद्धांताचा “मेरिट अँड मीन्स स्कॉलरशिप’च्या माध्यमातून भास्कर परिवार सन्मान करू इच्छितो. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा, लोक जोडण्याची क्षमता, व्यवसायवाढीचा ध्यास आणि सामाजिक हिताची जिद्द भविष्यात आमच्या प्रयत्नांना प्रेरणा देत राहील. आयआयएम अहमदाबादचे डायरेक्टर प्रो. एरोल डिसुझा म्हणतात, डीबी कॉर्पच्या स्कॉलरशिपचे महत्त्व आम्ही जाणून आहोत. विविध सामाजिक वर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ही स्कॉलरशिप अत्यंत महत्त्वाची आहे.बातम्या आणखी आहेत...