आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वेळी भटिंड्यातील सामना बादल विरुद्ध बादल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटिंडा - भटिंडा येथील निवडणूक गतवेळपेक्षा यंदा खूप वेगळी आहे. येथे इतर कोणी नाही, तर दीर-भावजय परस्परांविरोधत निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. दोन भावांमधील राजकीय मतभेदांमुळे शिरोमणी अकाली दलापासून वेगळे झालेले मनप्रीत बादल या वेळी स्वत:चा पक्ष ‘पीपीपी’ आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत. यंदाच्या निवडणुकीत मुद्दे मागे पडले आहेत. एकाच परिवारातील वाद रस्ता आणि चौकसभांसह एकंदरीतच निवडणुकीच्या रणापर्यंत पोहोचला आहे.

हरसिमरत बादल यांच्या सभेतील भाषणाची सुरुवात वाहे गुरू जी की फतेह व नंतर गत कार्यकाळातील विकासकामांच्या माहितीने होते. शेवटी आवाहन करणार्‍या या डॉयलॉगने- हुण तकडी तकडी कर देयो, ला दांगी विकास दे कम्मां दी हनेरी। मनप्रीत बादल यांच्या भाषणाची सुरवात- मेरे धरती माँ दे बेटे-बेटियों जेडा वोट पाउण दा हक सानूं मिला ए, ओ सानूं खैर चे नइ मिला..।भाषणाच्या शेवटी जयहिंद!

दोघेही संधी मिळेल तेव्हा भाषणाला भावनिक वळण देतात, ही त्यांच्या भाषणांतील समानता आहे. मनप्रीत देशभक्तीचा उल्लेख करून शेवटी आवाहन करतात, की सध्या सरासरी वयोमान 65 वर्षे असून, माझे वय 50 वर्षे झालेले आहे. माझ्याकडे 15 वर्षे आहेत. मृत्यूपूर्वी पंजाबच्या विकासाचा चढता आलेख पाहण्याची माझी इच्छा आहे.

हरसिमरत महिला मतदारांशी खुबीने नाते जोडतात. त्या म्हणतात, ‘तुम्ही आपल्या मुलांना काही वेळदेखील दूर ठेवू शकत नाहीत. पण, गेल्या पाच वर्षांपासून मी माझ्या मुलांपासून दूर राहून तुमच्या परिवारातील सदस्याप्रमाणे राहत आहे. मला मिळालेल्या खासदार निधीपेक्षाही अधिक रक्कम मी भटिंडाच्या लोकांसाठी आणि येथील विकासासाठी खर्च केलेली आहे.’

‘खुर्चीसाठी ते काँग्रेसवासी झाले’ - (शिअद-भाजप उमेदवार)
हरसिमरत कौर बादल यांचा प्रचार सकाळी नऊपासून सुरू होतो. गाव सेखू, सुखलदी व रामसरा येथे सभेची सुरुवात ‘वाहे गुरू की फतेह’द्वारे होते. नंतर राज्य सरकारच्या विविध विकासकामांचा पाढा सुरू होतो, जो केंद्राच्या नाकर्तेपणाच्या पाढ्यापर्यंत चालतो. ज्या भागात अथवा गावात त्या जातात तेथे पाच वर्षांतील खर्च केलेल्या निधीची माहिती त्या देतात. सभेत दीर मनप्रीत यांच्यावर कोटी करण्यास त्या विसरत नाहीत. त्या म्हणतात- ‘मेरे देवर दी शायरी ते नां जाईयो ओ तां लारे लांदै, पहलां ताए नूं छड ता, फेर पार्टी छड्डी, हुण कुर्सी लई कांग्रेस नाल जा मिलिया।’ हरसिमरत कौर बादल

‘पंजाबसाठी खुर्ची सोडली’ - मनप्रीत बादल (पीपीपी उमेदवार)
मनप्रीत यांचा प्रचार सकाळी सात वाजता आपल्या बादल या गावातून सुरू होतो. लवाजम्याविनाच ते गावोगाव जाऊन सभा घेतात. मात्र, ‘शिअद’मध्ये असताना ज्या काँग्रेसवर ते टीक करत, त्याच काँग्रेसची साथ घेऊन आता त्याच्या नावावरच ते मते मागत आहेत. उर्दू शायरीचे जाणकार असलेले मनप्रीत शिअदला उत्तर देतात- ‘मनप्रीत अर्थमंत्री होते, चार वेळा आमदार झाले, फक्त पंजाबसाठी खुर्ची सोडली. जे लोक म्हणतात, की मनप्रीत प्रामाणिक नाहीत, तर मी म्हणतो, की जे आपल्या पुतण्याचे नाही होई शकले ते लोकांचे
काय होणार?’