Home | Jeevan Mantra | Dharm | bhaubij 2018 story and ritual importance

यामुळे साजरी केली जाते भाऊबीज, भावाच्या दिर्घायुसाठी अशी करावी यमदेवाला प्रार्थना

रिलिजन डेस्क | Update - Nov 09, 2018, 12:05 AM IST

यासाठी साजरी केली जाते भाऊबीज, ही आहे रोचक कथा

 • bhaubij 2018 story and ritual importance

  कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीयेलाच भाऊबीज म्हटले जाते. या दिवशी भाऊ बहिणीकडे हक्काने जातो. प्रेमाने जातो, औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. मान्यता आहे की, या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते. या दिवसाचे महत्त्व खालील प्रमाणे आहे.


  धर्म ग्रंथांप्रमाणे, कार्तिक शुक्ल व्दितीयाच्या दिवशी यमुनाने आपला भाऊ यमला आपल्या घरी बोलवुन सत्कार करुन जेवू घातले. यामुळे या सणाला यम व्दितीया या नावाने देखील ओळखले जाते. तेव्हा यमराजने प्रसन्न होऊन यमुनेला वर दिला कि जो मनुष्य या दिवशी यमुनेत स्नान करुन यमाचे पूजन करेल, त्याला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. सूर्याची पुत्री यमुना सर्व कष्टांचे निवारण करणारी देवी स्वरुप आहे.


  त्यांचे भाऊ मृत्युचे देवता यमराज आहे. यम व्दितीयाच्या दिवशी यमुना नदीत स्नान करुन आणि तेथेच यमुना आणि यमराजची पूजा करण्याचे मोठे माहात्म मानले आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दिर्घायुष्यासाठी यमराजकडे प्रार्थना करते. स्किंद पुराणात लिहिले आहे की, या दिवशी यमराजला प्रसन्न करणा-यांना मनाप्रमाणे फळ मिळते. धन-धान्य, यश आणि दिर्घायुष्य प्राप्त होते.


  भावाच्या दिर्घायुसाठी कशी करावी यमराजला प्रार्थना, वाचा पुढील स्लाईडवर...

 • bhaubij 2018 story and ritual importance

  भावाचे आयुष्य वाढवायचे असेल तर यमराजला करा प्रार्थना
  सर्वात अगोदर भाऊ-बहिण दोघांनी मिळून यम, चित्रगुप्त आणि यमदूतांची पूजा करावी. बहिणीने भावाच्या आयुष्य वृध्दीसाठी यमराजच्या प्रतिमेचे पूजन करावे. प्रार्थना करावी की, मार्गण्डेय, हनुमान, बलि, परशुराम, व्यास, विभीषण, कृपाचार्य तसेच अश्वत्थामा या आठ चिरंजीवीयांप्रमाणेच माझ्या भावाला देखील चिरंजीवी करा.
  यानंतर बहिण भावाला भोजन वाढते. भोजनानंतर बहिण भावाला टिळा लावते. यानंतर भाऊ बहिणीला भेट देतो. ज्यामध्ये स्वर्ग, आभूषण, वस्त्र इत्यादी विशेषतः दिले जाते. लोकांमध्ये हा विश्वास आहे की, या दिवशी बहिणीने आपल्या भावाला हाताने जेवू घालावे. असे केल्याने त्याचे आयुष्य वाढते आणि जीवनाती कष्ट दूर होतात.


  भाऊ बीजेची कथा जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • bhaubij 2018 story and ritual importance

  भाऊबीजेची कथा
  ऋग्वेदात एक कथा आहे. ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली. या सर्व गोष्टींची परतफेड म्हणून सर्व ऋषी मुनींनी मोठा यज्ञ केला. मग या यज्ञात बळी काय द्यायचे हा प्रश्न पडला. यमराज तयार झाला आणि यज्ञात उडी घेतली. यमाने यज्ञात उडी घेतली, असे कळताच बंधू प्रेमामुळे यमाची बहीण यमी हिने देखील यज्ञात उडी घेतली. या आहुतीने यज्ञ समाप्ती झाली. देवही संतुष्ट झाले त्यांनी यमाला वर दिला सर्व लोक हा दिवस नक्कीच लक्षात ठेवतील. तुझे आत्मदहन वाया जाणार नाही. त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा करतील. यम दिसायला सुंदर होता. मृत्यू हा मुख्यत: शुभ आणि पवित्र आहे. तो जर नसेल तर जग किती भयंकर होईल. यम हा कार्तिक शुद्ध द्वितीयेला बहीण यमीच्या घरी जातो. यमी स्वागत करते, ओवाळते. यम तिला भेट देतो. याच दिवशी नरकात पडलेल्यांना एक दिवसापुरते मुक्त करतो. म्हणून भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात. आजच्या काळात भाऊ बहिणीचे नाते पवित्र आहे. आज हे नाते नि:स्वार्थ कसे राहील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडे सन्मानाने पाहिले पाहिजे. याच दिवशी यमाच्या चौदा नावाने तर्पण करण्याचीही प्रथा आहे तसेच यमाच्या नावाने दीपदान करण्याची प्रथा आहे.

Trending