आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: विश्वासातला सेवेकरी पोलिसांच्या ताब्यात, समोर येऊ शकते धक्कादायक माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचा विश्वासातील सेवेकरी विनायक दुधाळे याला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर विनायक फरार झाला होता. अखेर इंदूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता त्याला ताब्यात घेतले. विनायकसह इतर दहा जणांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

भय्यू महाराजांना करत होते ब्लॅकमेल..

विनायक दुधाळे, शरद देशमुख, शेखर पंडित आणि पलक नावाच्या महिलेच्या सहाय्याने ड्राइव्हर कैलास पाटील हा पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती भय्यू महाराजांचे वकील राजा बडजात्यांकडे पोलिसांना दिली होती. तेव्हापासून इंदूर पोलिस विनायकचा शोध घेत होते.

 

दरम्यान, भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. दोघांनी डीआजींकडे ड्राइव्हरचा जबाब नोंदविण्याची मागणी केली आहे. तसेच तरुणी आणि दोन सेेवेकरींवर ब्लॅकमेलींगचा आरोपही केला होता.

 

घरगुती वादामुळे नव्हे या कारणामुळे भय्युजी महाराजांनी केली आत्महत्या..

मीडिया रिपोर्टनुसार, भय्यू महाराजांच्या आत्महत्येमागे घरगुती वाद नसल्याचे समोर आले आहे. भय्यूजी महाराज यांची पत्नी आणि मुलीने डीआयजींसोबत याबाबत चर्चा केली. महाराजांना पैसा, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप दोघींनी केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला आधीचा ड्राइव्हर कैलाश पाटील याला या सगळ्या षड्यंत्रांची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे. त्यामुळे त्याचा जबाब कलम 164 च्या अंतर्गत नोंदवण्यात यावा. अशी मागणी आयुषी आणि कुहूने केली आहे.

 

दरम्यान, 12 जून रोजी भय्यूजी महाराजांनी इंदूर येथील सिल्व्हर स्प्रिंग टाऊनशिपममध्ये लायसेंस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती.

 

कोण आहे विनायक?
विनायक दुधाळे हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे. विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच राहात होता. भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभाग असायचा. विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे.

 

'तिने' महाराजांसोबत जुळवले होते प्रेमसंबंध..
भय्यू महाराजांना गोळी झाडून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्‍यात आले होते. फूटी कोठी भागात राहणारी एक तरुणीने भय्यू महाराजांसोबत प्रेमसंबंध जुळवले आणि अश्लील व्हिडिओ तयार केला. परंतु, डॉ.आयुषी शर्मांसोबत लग्नानंतर तिचे घरी येणे-जाणे बंद झाले. अश्लील व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत भय्यू महाराजांकडून दरमहा दीड लाख रुपये उकळण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगमध्ये महाराजांचा खास सेवेकरी विनायक दुधाळे आणि शेखरही सहभागी झाले. विनायकच्या माध्यमातूनच अनेकदा तरुणीशी संपर्क केल्याचा जबाब ड्रायव्हर कैलासने नोंदविला होता.

 

बातम्या आणखी आहेत...