आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शरद पवारांनी एसआयटीची स्थापन करण्याची मागणी केली होती. पण, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला धक्का देत प्रकरणाचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए (NIA)कडे सोपवला आहे. केंद्रीय गृहखात्याने याबाबत राज्य सरकारला माहिती दिली.
शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन पानांचे पत्र लिहून कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी त्या वेळेसच्या फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.
"पोलिसांनी अनेक पुरावे तोडून-मोडून सादर केले. माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन सरकारने पोलिसांसोबत मिळून षडयंत्र रचले होते. तसेच हिंसा केलेल्या मुख्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल न करता या प्रकरणावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला", असेही पवारांनी पत्रात म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.