आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडे, एकबाेटेंसह 58 जणांना काेरेगाव भीमा, वढूमध्ये बंदी; भीम अार्मीच्या सभेला परवानगी नाकारली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे ग्रामीण पाेलिसांनी काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनाेहर भिडे, समस्त हिंदू अाघाडीचे मिलिंद एकबाेटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण ५८ जणांना ३१ डिसेंबर व एक जानेवारी राेजी काेरेगाव भीमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली अाहे. गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती हाेऊ नये अाणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिसांनी पावले उचलली अाहेत.

 

पाेलिसांनी सीअारपीसी कलम १४४ नुसार विविध संघटनांशी संबंधित असलेल्या ५८ जणांना नाेटिसा बजावल्या असून सीअारपीसी १७७ नुसार १८८ जणांना दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले असून सरार्इत २९ जणांना ताब्यात घेण्यात आले अाहे. पाेलिसांनी नेमक्या काेणाकाेणाला नाेटिसा जारी केल्या अाहेत याबाबत खुलासा करण्यास नकार दिला असून जुन्या रेकाॅर्डवरील अनेकांची नावे यादीत समाविष्ट असल्याचे सांगितले अाहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेव बंद ठेवण्यात येणार अाहे. मुंबर्इ उच्च न्यायालयाने काेरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरातील जमीन दाेन दिवसांसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली अाहे. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडाेले यांनी शुक्रवारी काेरेगाव भीमा येथील जय स्तंभास भेट देऊन तयारीचा अाढावा घेतला.


भीम अार्मीच्या सभेला परवानगी नाकारली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भीम अार्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची ३१ डिसेंबर राेजी सभा अायाेजित करण्यासाठी भीम अार्मीतर्फे परवानगी मागण्यात अाली हाेती. मात्र, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईत रावणची सभा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...