Home | Maharashtra | Pune | bhim army chief chandrashekhar ravan comments against Narendra Modi

जिवाला धाेका असेल तर पंतप्रधानांनी परदेश यात्रा थांबवून घरातच बसावे

मंगेश फल्ले | Update - Jan 01, 2019, 08:04 AM IST

माओवादी कटाचे आरोप चुकीचे 'भीम अार्मी'चे प्रमुख चंद्रशेखर रावण यांचा टाेला

 • bhim army chief chandrashekhar ravan comments against Narendra Modi

  पुणे - 'एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे पाेलिसांनी काही विचारवंतांना अटक केली. त्यांचा संबंध शहरी नक्षलवाद्यांशी असल्याचे सांगितले. मात्र केवळ गाेपनीय पत्राच्या अाधारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या जिवाला धाेका अाहे असे सांगत विचारवंतांना माअाेवादी कटात सहभागाचा अाराेप करणे चुकीचे अाहे. खरे तर पंतप्रधानांच्या जिवाला धाेका असल्याचा केवळ प्रपाेगंडा केला जात अाहे. खरेच जिवाला धाेका असेल तर पंतप्रधानांनी विदेश यात्रा बंद करून घरीच बसावे,' असा टाेला भीम अार्मीचे प्रमुख चंद्रशेखर अाझाद ऊर्फ रावण यांनी माेदींना लगावला.

  'दिव्य मराठी'शी बाेलताना चंद्रशेखर म्हणाले, 'अारबीअायचे गव्हर्नर सांगतात की, रिझर्व्ह बँकेचे ३ लाख काेटी रुपये हडपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव हाेता. म्हणजे पुढील निवडणुकीत अापण जिंकणार नसल्याची भीती असल्याने त्यांनी देशाला लुटण्याचा उद्याेग सुरू केला अाहे. सर्वाेच्च न्यायालयाचे चार न्यायमूर्ती प्रसारमाध्यमांसमाेर येऊन देशात लाेकतंत्र, संविधानाची हत्या केली जात असल्याचे सांगतात. यावरून देशाची परिस्थिती बिघडल्याचे लक्षात येते.

  सीबीअायच्याच संचालकांवरच भ्रष्टाचाराचे अाराेप हाेतात ही लांच्छनास्पद बाब अाहे. बुलंद शहरात दाेन पाेलिसांची जमावाकडून हत्या हाेते, मात्र त्यावर चर्चा हाेत नाही. भाजपला गाय प्रिय असेल तर त्यांनी त्यास राष्ट्रीय पशूचा दर्जा द्यावा. एकीकडे त्यांच्यासाठी गाय गाेव्यात कापली तर चालते, मात्र इतर ठिकाणी गाेहत्येचे राजकारण केले जाते. धार्मिक मुद्दे उपस्थित करून देश ताेडण्याचे काम केले जात अाहे. देशात बहुजनांवर अत्याचार केला जात अाहे. हे सर्व राेखण्यासाठी व बहुजनांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याकरिता मी अागामी निवडणुकीत प्रयत्नशील राहणार अाहे. '

  संभाजी भिडे, एकबाेटेंना नजरकैदेत ठेवा
  काेरेगाव भीमा येथील पूजा सकट या तरुणीचा खून करण्यात अाला अाहे. या गुन्हयातील नऊ अाराेपींवर अद्याप कारवार्इ झाली नसल्याने याबाबत पाेलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार अाहे. काेरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे, मिलिंद एकबाेटे यांच्यावर काेणतीही ठाेस कारवार्इ झालेली नसून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात अाहे. या दाेघांना नजरकैदेत ठेवून त्यांची सखाेल चाैकशी करणे अावश्यक अाहे, असे चंद्रशेखर यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

  काेरेगाव भीमाला जाणारच
  चंद्रशेखर म्हणाले, 'न्यायालयाने मला काेरेगाव भीमात सभा घेण्यास मनार्इ केली असली तरी तिथे जाण्यास मज्जाव केलेला नाही. भारताचा नागरिक म्हणून मी कुठेही जाऊ शकताे. काेरेगाव भीमा हे शाैर्याचे प्रतीक असून डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे त्या ठिकाणी जात हाेते. त्यामुळे ते अामच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाण अाहे. मीही काेरेगाव भीमा येथे जाऊन अभिवादन करणारच अाहे. त्यासाठी सातत्याने काेणाची परवानगी घेण्याची मला गरज वाटत नाही. मी काही अपराधी, दहशतवादी नाही.'

  फुलेवाड्याला भेट
  चंद्रशेखर यांची साेमवारी पुण्यात एसएसपीएमएस मैदान व पुणे विद्यापीठ या ठिकाणी सभा अायाेजित केली हाेती. मात्र, न्यायालयाने त्यास मनाई केली. त्यामुळे चंद्रशेखर यांनी गंज पेठेतील भिडे वाडा येथे भेट देऊन अभिवादन केले. 'महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पाहिली शाळा सरकारने पुन्हा सुरू करावी अशी अामची मागणी अाहे,' असे ते म्हणाले. ३ व ४ जानेवारी राेजी लातूर व अमरावती येथील सभेस परवानगी मिळाल्याने सभा हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Trending