Bhim Army / केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सोलापुरातील रविवारची सभा उधळून लावणार , भीम आर्मीचा इशारा

शहांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप, मैदानाला छावणीचे स्वरूप

Aug 31,2019 03:32:48 PM IST

सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (1 सप्टेंबर रोजी) सोलापुरात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भीम आर्मीने अमित शहांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. अमित शहा यांची उद्या सोलापुरात सायंकाळी होत आहे. शहांच्या या सभेला भीम आर्मीचा तीव्र विरोध आहे. त्यातच आता भीम आर्मीने ही सभाच उधळून लावण्याची धमकी दिली आहे.


राज्यातील दलित सुरक्षित नाहीत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री सभा घेत फिरत आहेत, असा आरोप भीम आर्मीने केला. दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील चुनाभट्टी परिसरात सोनाली शिंदे या दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आणि उपचारादरम्यान त्यातच तिचा मृत्यू झाला. त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असा आरोप भीम आर्मीने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोलापुरातील सभा आणि त्यातच भीम आर्मीने दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ज्या ठिकाणी अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची सभा होणार त्या परिसराला तर अक्षरशः छावणीचे स्वरुप आले आहे.

X