आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर, मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एनआयएकडे तपास सोपवण्यासंबंधी कसलेही पत्र आपल्याला मिळाले नसल्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी नागपुरात केला, तर एनआयएच्या तपासात सहकार्य न केल्यास राज्य सरकारला गंभीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिला. या संदर्भात गृहमंत्री देशमुख म्हणाले, एनआयएला तपास सोपविण्यासंबंधीचे पत्र मला मिळालेले नाही. एनआयएचे पथक पुण्यात आल्याची माहिती माझ्याकडे नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, एनआयएचा अशा पद्धतीने महाराष्ट्रात हस्तक्षेप व्हावा, हे योग्य नाही. त्यासाठी महाराष्ट्राची सहमती घ्यायला हवी होती. किमान चर्चा तरी करायला हवी होती. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपवणे हे केंद्राचे योग्य पाऊल असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.