आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार एनआयएला सहकार्य करत नसेल तर बर्खास्त करण्याची तरतूद; मुनगंटीवारांची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी महाराष्ट्र सरकार एनआयएला सहकार्य करत नसेल तर सरकार बर्खास्त होऊ शकते असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. भीमा कोरेगाव दंगलीचा तपास एनआयकडे देण्यात आला. त्याला राज्य सरकारकडून विरोध होत असताना भाजप नेते मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया मंगळवारी एका खासगी माध्यमाला दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या आठवड्यातच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे झाला नाही अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यांनी याबाबत गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि स्वतंत्र समितीच्या माध्यमातून तपासाची तयारी सुद्धा सुरू झाली. याची कुण-कुण लागताच अचानक केंद्रातील मोदी सरकारने हा तपास एनआयकडे सोपवल्याची घोषणा केली. यानंतरच राज्यातील भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद सुरू झाला.

इंदिरा गांधींची आठवण करून दिली...


सुधीर मुनगंटीवार मंगळवारी बोलताना म्हणाले, "एनआयए कायदा आंतरराज्य विषयांसाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्याची निर्मिती भाजप नव्हे, तर काँग्रेसची सत्ता असतानाच झाली. अशात एखादे राज्य सरकार समाज विघातक शक्तींना प्रोत्साहित करत असेल. केंद्रीय तपास संस्थेच्या चौकशीत अडथळे आणत असेल तर कायदा आपले काम करेल." मुनगंटीवारांनी यापूर्वी झालेल्या कारवायांचे उदाहरण सुद्धा दिले. त्यांनी दावा केला, की "राज्यांनी सहकार्य नाही केल्यामुळे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात 97 वेळा राज्यांविरुद्ध कारवाया झाल्या आहेत. कायद्यात अशा सरकारला घालवण्याच्या तरतुदी सुद्धा स्पष्ट करण्यात आल्या आहेत."

राज्य सरकारच्या परवानगीची गरज नाही


भाजप नेते पुढे म्हणाले, 2007-08 मध्ये हा कायदा तयार करण्यात आला. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यांनीही राज्यात एनआयए तपासासाठी राज्याच्या परवानगीची गरज नाही हे मान्य केले होते. दहशतवादी कृत्य किंवा इतर गंभीर गुन्हे, जे की आंतरराज्य विषय आहेत. अशा सर्व प्रकरणांचे तपास राज्याची परवानगी न घेता एनआयएकडे सोपविले जाऊ शकतात. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा केवळ महाराष्ट्र नाही तर इतर राज्यांशीही संबंध आहे. त्यामुळेच, एनआयएने हा तपास आपल्याकडे घेतला आहे.