आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिसांचा खळबळजनक खुलासा, भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी गौतम नवलखा दहशदवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या संपर्कात होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्यातील भीमा कोरेगावात झालेल्या हिंसाचाराचा आरोपी गौतम नवलखाचे पाकिस्तानातील दहशदवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन संपर्क असल्याचे उघड झाले आहे. ही माहिती पुणे पोलिसांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, नवलखा काश्मीरमधील उग्रवादी आणि हिजबुलच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांच्या संपर्कात होता.

 

प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी, पोलिसांनी नवलखाची सुटका न करण्याची विनंती हाय कोर्टात केली आहे. न्यायालयाने पुढील निर्णयापर्यंत नवलखाचा तुरुंगवास वाढवत त्याला सुरक्षे देण्यास सांगितले आहे. राज्य सरकारकडून वकील अरुणा पई आणि नवलखाकडून वकील युग चौधरीने कोर्टासमोर आपले म्हणने मांडले.


नवलखाने कोर्टाकडे सर्व आरोप हटवण्याची मागणी केली
अरुणाने कोर्टात पुणे पोलिसांच्या चार्जशीटच्या आधारे सांगितले, 'भीमा कोरेगावच्या चौकशीत समोर आले आहे की, पाकिस्तानातील दहशदवादी संघटनेच्या माध्यमातून माओवाद्यांना हत्यारे पुरवले होते.' अर्बन नक्सल केसचा आरोपी नवलखाने हायकोर्टमध्ये याचिका दाखल करुन त्याच्यावर दाखल झालेली प्रकरणे हटवण्याची अपील केली आहे. हायकोर्टाने यावर राज्य सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.


दलित संघटनांनी केले होते आयोजन
1 जानेवारी 1818 ला भीमा-कोरेगावच्या लढाईथ पेशवा बाजीराव द्वितीयवर इंग्रजांनी विजय मिळवला होता. यात दलितदेखील सामील होते. नंतर इंग्रजांनी कोरेगावमध्ये आपल्या विजयाच्या आठवणीत जयस्तंभ बांधला होता. पुढे हे दलितांचे प्रतीक बनले. या लढाईला 200 वर्षे पूर्ण झाल्याने दलित संघटनांनी 1 जानेवारी 2018 मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला होता. यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर 50 पेक्षा अधिक गाड्या जाळल्या होत्या.