आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल समर्थक कवी राव पुन्हा अटकेत, पोलिस आज पुणे न्यायालयात हजर करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून पुन्हा अटक केली. नजरकैदेची मुदत संपल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी दिली. 

 

या प्रकरणात त्यांना सुरुवातीला २८ आॅगस्टला अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना कोठडीत ठेवण्याऐवजी नजरकैद सुनावण्यात आली होती. दरम्यान, नजरकैदेची मुदत संपल्याने ती वाढवून देण्याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आल्याने त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. बंदी असलेल्या सीपीआय या माओवादी संघटनेला पैसे पुरवण्यासोबत काम तसेच देशविघातक कृती करण्यासाठी कोणती शस्त्रे खरेदी करायची याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार वरवरा राव यांना होता. कोणती शस्त्रे खरेदी करावयाची याबाबत एक कॅटलॉग तयार करण्यात आला होता. त्यातील निवडक शस्त्रे खरेदी करण्याचे अधिकार राव यांना देण्यात आले होते, असे पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात ६ जून रोजी सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे व रोना विल्सन यांना अटक करण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...