आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बारामधील सहावे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर, कुंभकर्णाच्या मुलामुळे झाली याची स्थापना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना 30 ऑगस्टपर्यंत आहे. या महिन्यात शिव उपासना आणि मंदिरांमध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. शिव भक्त या महिन्यात आपल्या सामर्थ्य आणि वेळेनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. बारा ज्योतिर्लिंगामध्ये भीमाशंकर सहावे ज्योतिर्लिंग आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पुण्यापासून 127 किमी अंतरावर असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.

जाणून घ्या, कसे आहे हे मंदिर..
भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसून येते. मंदिर परिसरात शनि मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो.

असे स्थापित झाले हे ज्योतिर्लिंग....
प्राचीन कथेनुसार, कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली, काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजे. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. 

त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. यामुळे क्रोधीत झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातुन स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले. युद्धमध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले.

0