आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 15 जानेवारीला मकरसंक्रांती आहे. संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायण होतो. भीष्म पितामह यांनी सूर्य उत्तरायण झाल्यानंतरच प्राण त्याग केला होता. महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथामध्ये विविध प्रमुख पात्र असून भीष्म पितामह त्यामधील एक आहेत. भीष्म पितामह एकमेव असे पात्र आहेत, जे महाभारताच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित होते. येथे जाणून घ्या, भीष्म पितामह यांच्याविषयी काही खास गोष्टी...
पूर्वजन्मात वसु होते भीष्म
भीष्म पितामह पूर्वजन्मात वसु (एक प्रकारचे देवता) होते. यांनी बळजबरीने ऋषी वशिष्ठ यांच्या गायीचे हरण केले होते, ज्यामुळे क्रोधीत होऊन ऋषी विशिष्ठ यांनी त्यांना मनुष्य रुपात जन्म घेण्याचा आणि आजीवन ब्रह्मचारी राहण्याचा शाप दिला होता.
परशुराम यांच्याकडून शिकली शस्त्र विद्या
भीष्म राजा शांतनु व गंगा यांचे आठवे आपत्य होते. बालपणी यांची नाव देवव्रत होते. भगवान परशुराम हे यांचे गुरु होते. एकदा देवव्रतने बाण सोडून गंगा नदीचा प्रवाह अडवला होता. देवव्रतची योग्यता पाहून शांतनू यांनी त्याला युवराज घोषित केले.
यामुळे यांना म्हटले जाते भीष्म
देवव्रतने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजीवन ब्रह्मचारी राहण्याची आणि हस्तिनापुरची सेवा करण्याची शपथ घेतली. एवढी भीषण प्रतिज्ञा घेतल्यामुळे यांचे नाव भीष्म पडले. प्रसन्न होऊन शांतनू यांनी त्यांना इच्छामृत्युचे वरदान दिले होते.
युधिष्ठीरला दिला होता विजयाचा आशीर्वाद
कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरु होण्यापूर्वी युधिष्ठीर भीष्म पितामह यांच्याकडे युद्ध करण्याची आज्ञा घेण्यासाठी आले. प्रसन्न होऊन भीष्म यांनी त्यांना युद्धामध्ये विजय होण्याचा आशीर्वाद दिला. आपल्या मृत्यूचे रहस्यसुद्धा स्वतः भीष्म यांनी पांडवांना सांगितले होते.
उत्तरायणात केला प्राणत्याग
जेव्हा अर्जुनाने भीष्म पितामह यांना जखमी केले, त्यावेळेस दक्षिणायन चालू होते. यामुळे भीष्म पितामह यांनी प्राणत्याग केला नाही. 58 दिवस ते बाणांच्या शय्येवर पडून होते. सूर्य उत्तरायण झाल्यानंतरच त्यांनी योगाने आपल्या प्राणाचा त्याग केला.
असे निघाले पितामह भीष्म यांचे प्राण
पितामह भीष्म यांनी योगाने आपल्या प्राणांचा त्याग केला. भीष्मांचा प्राण ज्या अवयवाचा त्याग करून बाहेर पडत होता, त्या अवयवातील बाण खाली पडत होते आणि जखमही भरत होती. भीष्माने देहाचे सर्व द्वार बंद करून प्राण थांबवला आणि यामुळे प्राण मस्तक (ब्रह्म रंध्र) फोडून आकाशात निघून गेला. अशाप्रकारे महात्मा भीष्म यांचे प्राण आकशात विलीन झाले.
श्रीकृष्ण झाले क्रोधीत
युद्धामध्ये भीष्माद्वारे पांडवांच्या सैन्याचा विनाश पाहून श्रीकृष्णाला खूप राग आला. अर्जुनाला भीष्म यांच्यावर पूर्ण शक्तीने वार न करताना पाहून ते स्वतः चक्र घेऊन भीष्म यांच्यावर चालून गेले. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला थांबवले आणि पूर्ण शक्तीने भीष्म यांच्यासोबत युद्ध करण्याचे वचन दिले.
आपल्या गुरुसोबत केले होते युद्ध
पितामह भीष्म यांनी आपले गुरु परशुराम यांच्यासोबतही युद्ध केले होते. हे युद्ध 23 दिवस चालले. शेवटी आपल्या पितरांच्या आज्ञेचे पालन करीत भगवान परशुराम यांनी शस्त्र खाली ठेवले. अशाप्रकारे या युद्धामध्ये कोणाचाही विजय आणि पराजय झाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.