आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोलताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, सांगितले आहे महाभारतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमची बोलण्याची पद्धत तुमच्या स्वभावाविषयी बरेच काही सांगून जाते. याच्या माध्यमातूनही लोक तुमच्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतात. महाभारताच्या शांती पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी वाणी म्हणजे बोलण्याच्या 4 विशेषता कोणत्या आहेत याविषयी सांगितले आहे. ज्या व्यक्तीच्या बोलीमध्ये या 4 विशेषता असतात तो व्यक्ती सर्वांना प्रिय असतो.


अव्याहृतं व्याहृताच्छ्रेय आहुः
सत्यं वदेद् व्याहृतं तद् द्वितीयम्।
वदेद् व्याहृतं तत् तृतीयं प्रियं,
धर्मं वदेद् व्याहृतं तच्चतुर्थम् ।। 


अर्थ- व्यर्थ बोलण्यापेक्षा मौन राहणे कधीही चांगले आहे. ही वाणीची प्रथम विशेषता आहे. सत्य बोलणे वाणीची दुसरी विशेषता आहे. गोड बोलणे वाणीची तिसरी विशेषता आहे. धर्मसम्मत बोलणे ही वाणीची चौथी विशेषता आहे.


1. ज्या बोलण्याचा काही अर्थच नसेल अशा गोष्टी बोलण्यापेक्षा गप्प बसने जास्त उत्तम आहे.


2. नेहमी सत्य बोलावे. यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल.


3. सत्य गोष्ट गोड आवाजात बोलणे वाणीची तिसरी विशेषता आहे. यामुळे तुम्ही सर्वांचे लाडके बनू शकता.


4. सत्य गोष्ट, गोड आवाजात आणि धर्मानुसार बोलल्यास त्याचे महत्त्व अधिकच वाढते.