आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे भोजपुरी सिनेमांची सनी लिओनी, चेहराच नव्हे तर फिगरसुद्धा आहे सनीसारखीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री सनी लिओनीसारखी हुबेहुब दिसणारी भोजपुरी अभिनेत्री पल्लवी सिंहने सनीच्या सन्मानार्थ स्वतःचे नाव बदलून सनी असे ठेवले आहे. पल्लवीने केवळ स्वतःचे नावच बदलले नाही तर सनीची प्रत्येक अदासुद्धा ती कॉपी करते. भोजपुरी सिनेसृष्टीत पल्लवीची लोकप्रियता एवढी आहे, की लोक तिला आता तिच्या ख-या नावाने नव्हे तर सनी सिंह म्हणून ओळखतात.

 

जेव्हा फ्रेंड्स म्हणाले, अरे तू तर हुबेहुब सनी लिओनीसारखीच दिसते... 
भोजपुरी सिनेमांमध्ये काम करणा-या अभिनेत्री पल्लवी सिंहला तिचे फ्रेंड्स नेहमीच तिचा चेहरा सनी लिओनीशी मिळताजुळता असल्याचे सांगायचे. इतकेच नव्हे तर पल्लवीची फिगरसुद्धा सनीसारखीच आहे.

 

6 वर्षांपुर्वी सनीला पाहिले आणि मानू लागली रोड मॉडल 
पल्लवीने सांगितले की, 2012 मध्ये तिने पहिल्यांदा सनी लियोनीला टीव्हीवर पाहिले. सनीचा चेहरा पाहून ती हैराण झाली कारण ती हुबेहुब तिच्यासारखी दिसत होती. यानंतर पल्लवी सनी लियोनीला रोल मॉडल मानू लागली. पल्लवी उर्फ सनी सिंहने भोजपुरी फिल्म 'लेके आजा बँड बाजा ए पवन राजा' मध्ये अॅक्टर पवन सिंहच्या मेहूणीची भूमिका साकारली होती. 'भोजपुरिया राजा'मध्ये पल्लवीला सेकेंड लीड रोल मिळाला. 


आयटम साँगमुळे नाही अडचण
पल्लवी मानते की, स्टोरीनुसार चित्रपटांमध्ये आयटम नंबर डान्सही करावा लागतो. यासाठी कथेच्या डिमांडनुसार ती काम करते. पल्लवीने 'विधायक जी' आणि इडिया फिल्म 'टायगर'मध्येही आटम नंबर केला आहे.


चित्रपटांसोबतच शिक्षण घेतेय 
सनी उर्फ पल्लवीने सांगितले की, ती चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अभ्यासही करत आहे. सध्या तिने बीकॉम कम्प्लीट केले आहे. सनीनुसार, "शिक्षणादरम्यान अनेक फ्रेंड्स म्हणायचे की, तिचा लूक चांगला आहे, तिने चित्रपटांमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. यानंतर तिने ट्राय केले तर तिला काम मिळाले आणि अशा प्रकारे ती चित्रपटांमध्ये आली."

 

आईवडील म्हणाले, सिनेमांऐवजी नोकरी कर..
सनीने सांगितले, जेव्हा मी सिनेसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझे आईवडील माझ्या निर्णयाच्या विरोधात होते. सिनेमांमध्ये काम करण्यापेक्षा एखादी चांगली नोकरी कर, असे त्यांनी मला म्हटले होते. मात्र माझ्या हट्टासमोर ते हरले आणि त्यांनी मला सांभाळून या सिनेसृष्टीत काम कर असा सल्ला दिला.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, भोजपुरी सिनेसृष्टीतील सनी लिओनीचे Photos...
 

बातम्या आणखी आहेत...