आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफत्तेपूर - परतीच्या पावसामुळे वाया गेलेल्या पिकांमुळे तणावाखाली असलेल्या तरुण शेतकऱ्याने घरच्यांना भोकरदनला जाऊन येतो, असे सांगितले. परंतु, तो भोकरदनला न जाता गाव परिसरात असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील गारखेडा देवी येथे घडली. समाधान शेनफड साबळे (३६♦) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
समाधान साबळे यांनी स्टेट बँक ऑफ हैदराबाद कडून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊन पिकांची लागवड केली होती. दरम्यान, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. यात साबळे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्यामुळे साबळे तणावाखाली आले होते. यामुळे काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजता त्यांनी घरातून बाहेर पडतांना घरच्यांना भोकरदन येथे जाऊन येतो, असे सांगितले. परंतू, तणावाखाली असलेल्या साबळे यांनी भोकरदनला न जाता रस्त्यातच असलेल्या एका जणाच्या शेतातील विहीरीत उडी मारुन जीवनयात्रा संपविली, असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तात्काळ पंचनामे करण्यासाठी सहकाऱ्यांना घटनास्थळावर पाठविले. सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.