आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री जवळपास 3.45 ला अचानक MBA विद्यार्थीनीला आली जाग, समोर उभी होती व्यक्ती, ओरडताच तोडांवर मारला टॉर्च, काही कळण्यापु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ. रिक्योरिटी एजेंसी संचालकच्या घरात घुसलेल्या तीन टवाळखोरांनी एमबीएच्या विद्यार्थींनीवर चाकूने दोन वार केले. बेडरुममध्ये या टवाळखोरांना पाहून मुलीने आरडाओरड केली. मुलीचा आवाज ऐकूण आईने खिडकीतून डोकावले तर विनानंबरच्या गाडीवर आलेल्या त्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे पोलिसांनी एजेंसी संचाकलाकाडून लिखित आवेदन घेतले. संध्याकाळी तक्रार दाखल करण्यात आली, पण यामध्ये विद्यार्थीनीवर चाकू हल्ला झाला याचा उल्लेख नाही. 


ही भयावरह घटना 245, ए-सेक्टर राजीव नगर निवासी 51 वर्षांच्या राजेश सोनी यांच्या घरी झाली. ते येथे पत्नी ऋतु, मुलगी सिमरन(22) आणि मुलगा अनमोल (13) सोबत राहतात. सिमरन एमबीएसोबतच स्पर्धा परिक्षांची तयारी करतेय. सोनीने सांगितले की, सोमवारी जवळपास पहाटे 3:45 वाजता मी एका नातेवाईकाला सोडण्यासाठी हबीबगंज रेल्वे स्टेशन येथे जात होतो. शक्तीनगरला पोहोचलो तेव्हाच मुलीचा कॉल आला की, पापा घरी चोरी झाली आहे. मी घरी परतलो तेव्हा सिमरनच्या हातावर आणि डाव्या पायावर वार केलेले होते. रक्त वाहत होते. 100 नंबर डायल करुन पोलिसांना बोलावले. पोलिसांनी विचारपुस केली आणि निघून गेले. 
विद्यार्थीनीची आपबीती... चेह-यावर टॉर्च चमकवला आणि हल्ला केला 


"मी बेडरुममध्ये एकटी झोपले होते, मम्मी आणि अनमोल दूस-या खोलीत होते. अलमारीचा आवाज आल्यामुळे सकाळी 4 वाजता मला जाग आली. अलमारीजवळ कुणीतरी उभे होते. पहिले वाटले पापा असतील, मग लक्षात आले की, ते स्टेशनला गेले आहेत. लक्षपुर्वी पाहिले तर दिसले की, तोड बांधून टवाळखोर उभा होता. मी आरडाओरड सुरु केले, त्याने माझ्या चेह-यावर टॉर्च चमकवला आणि चाकूने हल्ला केला. मी बचाव करण्यासाठी हाताने चाकू अडवला तर माझ्या हाताला लागले. डाव्या पायालाही लागले. यानंतर हे बदमाश दरवाज्याने बाहेर पळाले."
- सिमरन सोनी, एमबीए विद्यार्थीनी 

 

वडिलांची तक्रार, एएसआय आले, म्हणाले - उद्या भेटतो 
विद्यार्थीनीचे वडील राजेश यांनी सांगितले की, डायल 100 ची टीम गेल्यानंतर मी अयोध्या नगर ठाण्यात फोन केला. तिथे सहायक उप निरीक्षक (एएसआय) अरविंद सिंह आले. पुर्ण घटनाक्रम विचारला आणि एफआयआर न घेताच निघून केले. म्हणाले - उद्या भेटतो. यानंतर आम्ही स्वतःच सिमरनला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे त्यांनी तिच्यावर उपचार केले. राजेशनुसार संध्याकाळी पोलिसांना सामान्य कलरमांमध्ये केस दाखल केली. म्हणजे फक्त चोरीचा प्रयत्न केला अशी तक्रार लिहिले. या एफआयआरमध्ये सिमरनवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख नाही. तर अयोद्या नगरचे टीआय हरीश यादव म्हणतात की, या प्रकरणाची माहिती मिळताच मी एफआयआर दाखल केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...