आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhopal News Youth In Depression Commit Suicide Due To Non Availability Of Good Jobs

20 वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या, आवडता जॉब न मिळाल्यामुळे संपवली जीवनयात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - शाळा आणि महाविद्यालयात नेहमी अव्वल राहणाऱ्या युवकाने आवडती नोकरी न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नैराश्य आल्यामुळे त्याने दीड महिन्यापासून आरशामध्ये स्वत:चा चेहरा पाहिला नव्हता. आरशामध्ये चुकूनही चेहरा दिसू नये यासाठी त्याने आरशावर पडदा टाकला होता. मी काहीच नाही करू शकलो, चांगल्या शाळेत शिकलो असतोत तर काही चांगले झाले असते. माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही अशा प्रकारची सुसाइड नोट त्याने मोबाइलमध्ये लिहीली होती.  


> बाग उमराव दूल्हा ऐशबाग येथील निवासी गुफरान कादरी (वय 20 वर्षे) एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. मृतकचा मोठा भाऊ इमरान नुसार - गुफरान खूप दिवसांपासून नैराश्यात होता. काही दिवसांपूर्वीच तो नवीन कंपनीत सामील झाला होता. सोमवारी रात्री गुफरान घरी आल्यानंतर त्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले होते. आई कामात व्यस्त होती तर त्याच्या बाजूच्या खोलीत बहीण होती. बराचवेळ झाला तरी काहीच आवाज आला न आल्यामुळे आईने दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आईने खिडकीतून डोकावून पाहिल्यावर गुफरानने गळफास घेतल्याचे दिसले.
 
मोबाइलमध्ये लिहीले आत्महत्ये कारण
> आईचा आवाज ऐकताच त्याची बहीण दरवाजा तोडून आत पोहोचली. तेवढ्यात घराजवळून जात असलेल्या पोलिसांनी गुफरानला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. गुफरान जवळ एक मोबाइल सापडला. त्यातील मेमो मध्ये त्याने आत्महत्या मागचे कारण लिहीले होते. त्यात लिहीले होते की, तो चांगल्याप्रकारे शिकला नाही. मला एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला असता तर मी चांगला शिकलो असतो. पण तसे झाले नाही. गुफरानने सुसाइड नोटमध्ये त्याच्या आत्महत्येस कोणालाही कारणीभूत ठरविले नाही. त्याने स्वखुशीने हे पाऊल उचलल्याचे नोटमध्ये नमूद केले आहे.  

 

स्वत:चा चेहरा पाहण्याची नव्हती इच्छा
> इमरानने सांगितले की आम्ही मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. गुफरानचे 8 वी पर्यंतचे शिक्षण झांसी येथे झाले. त्यानंतर आम्ही भोपाळला आलो, पण गुफरान येथील शिक्षण व्यवस्थेवर नाराज होता. यामुळे तो परत यूपीला गेला पण शाळा बदलल्यामुळे मित्र सुटल्याने तो टेंशनमध्ये आला. झांसी येथे 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो भोपाळला परत आला. बीकॉम करत असतांना कॉल सेंटरमध्ये नोकरी करण्यास सुरूवात केली. नोकरी करत असताना त्याने इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने जयपूर आणि इंदुर येथे कॉल सेंटरच्या जॉबसाठी इंटरव्ह्यू दिला होता. पण त्याला तिथे नोकरी मिळाली नाही. चार-पाच दिवसांपासून त्याने नवीन कंपनीत नोकरी करण्यास सुरूवात केली होती. सोमवारी ऑफीसमधून घरी आल्यावर तो गुमसुम होता. त्याने खोलीतील आरसा दीड महिन्यापासून झाकला होता. कारण त्याला स्वत:चा चेहरा बघायची अजिबात इच्छा नव्हती. तो खूप लठ्ठ होत आहे त्यामुळे तो चांगला दिसत नाहीये असा त्याचा समज होता. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता पण तो नैराश्यातून बाहेर आला नाही.  

बातम्या आणखी आहेत...