आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपळ्याच्या रसामुळे दूर होतील अनेक आजार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपळ्याच्या रसासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक संशोधन केले होते. इंग्रजीत बॉटल गार्ड या नावाने दुधी भोपळ्याला ओळखले जाते. मानवजातीने सर्वप्रथम घेतलेले भाजीपाल्याचे पीक म्हणजे दुधी भोपळा होय. 


- प्रोटीन, फायबर, मिनरल, कार्बोहायड्रेट यांचे भरपूर प्रमाण या भोपळ्यात असते. भोपळ्यात अनेक औषधी गुण आहेत. 


- कमी मसाला घालून भोपळा उकडून त्याची भाजी खाल्ल्यास डायुरेटिक, डिप्रेशन या आजारांवर लाभदायक आहे. - पित्त दूर करणारी ही औषधी वनस्पती आहे. 


- भोपळ्याचा रस काढून लिंबू रसासोबत रोज सकाळी एक ग्लास घेतल्यास हा रस नैसर्गिक अल्कलाझरचे काम करतो. लघवीत होणारी जळजळ काही क्षणांत दूर होते. 


- डायरिया या आजारात भोपळ्याच्या रसात थोडे मीठ आणि साखर मिसळून दिल्यास लगेच आराम मिळतो. 


- भोपळ्याच्या रसात सीसम तेल मिसळून तळव्यांवर हळुवारपणे चोळल्यास चांगली झोप लागते. मिर्गी आणि अन्य आजारांत हा रस फायदेशीर ठरतो. 


- अॅसिडिटी, पोटाचे विकार, अल्सर यांनी त्रस्त असाल तर घाबरू नका. भोपळ्याच्या रसाने हे विकार पळून जातील. नियमित भोपळ्याची भाजी खाल्ल्याने जुनी बद्धकोष्ठताही दूर होते. 


- याशिवाय संगीतप्रेमींनी याचा उपयोग वाद्ययंत्र म्हणून आणि ऋषी-मुनींनी कमंडलू म्हणून केल्याचे दिसते. नव्याने पोहायला शिकणारी मंडळीही याचा उपयोग करतात. सहज उपलब्ध होणारी ही भाजी साधी आहे असे समजू नका. अनेक आजारांना पळवून लावणारा भोपळा आवर्जून खा. 

बातम्या आणखी आहेत...