• Home
  • News
  • Bhumi Pednekar cycles up to 17 km to reach shooting location of 'Durgawati'

बिहाइंड द सीन / 'दुर्गावती' च्या शूटिंग लोकेशनवर पोहोचण्यासाठी भूमी पेडनेकरने 17 किमीपर्यंत चालवली सायकल

भूमी पेडणेकरने 17 किमीपर्यंत चालवली सायकल 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 03:47:04 PM IST

बॉलिवूड डेस्क : भूमी पेडनेकर सध्या भोपाळमध्ये आहे, जिथे ती आपला आगामी चित्रपट 'दुर्गावती' चे शूटिंग करत आहे. भूमी ज्या हॉटेलमध्ये राहाते, तेथून शूटिंग लोकेशन सुमारे 17 किमी दूर आहे. अशात भूमीने गुरुवारी सायकल चालवून शूटिंग स्पॉटपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. सायकलिंगचा व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

#Durgavati #chanchalchauhan

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on


रुमालाने चेहरा बांधून सायकल चालवताना दिसली भूमी...


भूमी सकाळी शूटिंगसाठी निघाली. यापूर्वी तिने आपला चेहरा रुमालाने झाकला होता. आउटडोर सायकलिंगचे पूर्ण रेकॉर्डही तिने शेअर केले, ज्यामध्ये तिच्या स्मार्ट वॉचमध्ये टायमिंग आणि किमी दिसत आहेत. याच्या एका आठवड्यापूर्वी भूमी गल्ली क्रिकेट खेळताना दिसली होती.


भागमतीचा रीमेक आहे दुर्गावती...


भूमीचा हा चित्रपट 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्‌टीचा चित्रपट 'भागमती' चा रीमेक आहे. ज्यामध्ये अनुष्का शेट्टी, उन्नी मुकुंदन, जयराम, ऊषा सरत आणि विद्युलेखा रमन यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट 26 जानेवारी 2018 ला रिलीज झाला होता. चित्रपटात अरशद वारसीदेखील व्हिलनच्या रोलमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारव्यतिरिक्त टी-सीरीजचा मालक भूषण कुमारदेखील चित्रपटाचा प्रेझेंटर आहे. तसेच अशोक याचे दिग्दर्शक आणि विक्रम मल्होत्रा प्रोड्यूसर आहे.

X
COMMENT