आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : भूमी पेडणेकरने चार वर्षांपासून आपल्या सोबत काम करणाऱ्या स्पॉट बॉय उपेन्द्र सिंहला नवा बिझनेस सुरु करण्यासाठी मदत केली. उपेंद्रने अशातच व्हॅनिटी व्हॅन बनवणारी एक कंपनी सुरु केली आहे. पहिली व्हॅन भूमीसाठी बनवली आहे. त्याचे म्हणणे आहे की, हे काम सुरु करण्यासाठी भूमीने त्याला मोटिव्हेट केले. तर अभिनेत्रीचे म्हणजे आहे की, एका व्हॅनने सुरु झालेला हा प्रवास लवकरच 100 पर्यंत पोहोचेल.
याबद्दल भूमीने सांगितले, 'उपेंद्र मागील 4 वर्षांपासून माझ्या सोबत आहे. वास्तविक मी त्याच्यासोबत माझे करिअर सुरु केले आणि तो माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. जेव्हा आम्ही 'सांड की आंख' चे शूटिंग करत होतो त्यावेळी प्रवासादरम्यान मला आयडिया आली आणि मी त्याला म्हणाले की, तू व्हॅनिटी व्हॅन बनवण्याचा बिझनेस का सुरु नाही करत ? मात्र त्याला कळत नव्हते की, सुरुवात कशी करावी, पण त्याला नेहमीच स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी स्वतःचे काहीतरी सुरु करायचे होते.'
मुलाच्या नावाने सुरु केली कंपनी...
भूमीने पुढे सांगितले, 'मला प्रामाणिकपणे वाटते की, सर्वांना आयुष्यात संधी मिळाली पाहिजे. तो अशी व्यक्ती आहे, ज्याच्याविना वास्तविक मी अशी राहणार नाही आणि जे काही मी त्याच्यासाठी करू शकत असेल ते मी करेन. त्याने आकाश व्हॅनिटी नावाने एक कंपनी सुरु केली आहे. यामुळे त्याने आपली पहिली व्हॅनिटी मला गिफ्ट दिली आहे आणि त्याने हे माझ्यासाठी केले आहे. त्याने यासाठी खूप मेहनत केली आहे.
खूप लांबचा असेल हा प्रवास...
उपेंद्रचे कौतुक करत पुढे ती म्हणाली, 'मला त्याच्यावर गर्व आहे आणि मला अपेक्षा आहे की, एका व्हॅनसोबत सुरु झालेला हा प्रवास 100 व्हॅन पर्यंत जाईल. कारण तो एक खरा माणूस आहे. तो नेहमी माझ्यासाठी तिथे राहिला आणि माझी काळजी घेतली. त्याला आयुष्यात पुढे जाताना पाहणे एक वैयक्तिक विजय आहे. ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने मी त्याला मदत केली कारण तो खूप मेहनती आणि प्रामाणिक माणूस आहे. तो जास्तीत जास्त व्हॅनवर काम करेल आणि प्रोडक्शन हाऊसला भाड्याने देण्याचा विचार करत आहे.' आपल्यासाठी बनलेल्या व्हॅनबद्दल भूमी म्हणाली, 'त्याने व्हॅन माझ्या इनिशियल्ससोबत कस्टमाइज केली आहे आणि हे करण्यासाठी खूप वेळ दिला. ही खूपच कलरफुल आहे आणि रंगीत काच आणि गुलाबी भिंतींसोबत घरापासून दूर एका घरासारखीच वाटते.'
भूमी दीदीने मला मोटिव्हेट केले...
याबद्दल बोलताना उपेंद्र सिंह म्हणाला, 'मी व्हॅनिटी व्हॅनच्या बिझनेसबद्दल खूप दिवसांपासून विचार करत होतो, पण जेव्हा भूमी दीदीने या आइडियासाठी मला मोटिव्हेट केले, तेव्हा मी माझी कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. पुढच्यासाठीही मी हाच प्लॅन केला आहे की, मी व्हॅनिटी व्हॅन वेंडर बनेल. मी नेहमी दीदीचे नाव घेईन की, त्यांच्या सपोर्टने मी आपला बिझनेस, आपली पाहिली व्हॅन तयार केली आणि मी भूमी दीदीचे मनापासून आभार मानतो आणि देवाकडे हीच प्रार्थना करतो की, भूमी दीदी जो चित्रपट करेल तो चित्रपट सुपरहिट व्हावा.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.