आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला प्रत्येक चित्रपटात जोखीम घ्यायला आवडते : भूमी पेडणेकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: भूमी पेडणेकर खूपच मेहनती आणि प्रतिभावंत अभिनेत्री आहे. तीन वर्षांपूर्वी तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती स्टार अभिनेत्री झाली आहे. भूमीचे आतापर्यंतचे सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. तिच्याशी झालेला संवाद - 

 

भूमी म्हणते..., 'मी स्वत:ला खूप लकी मानते. मला चांगले चित्रपट आणि चांगल्याच कथा मिळत गेल्या. त्यामुळे मी चांगले काम करू शकले. शिवाय मी त्या सर्वच निर्मात्यांचे आभारी आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली. भूमीने नुकतेच अभिषेक चौबेच्या 'सोन चिरैया' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शिवाय ती करण जोहरच्या ऐतिहासिक 'तख्त' चित्रपटातदेखील काम करणार आहे, जो एक मल्टिस्टारर चित्रपट आहे. यात भूमीच्या व्यतिरिक्त रणवीर सिंह, आलिया भट्ट, करिना कपूर खान, जाह्नवी कपूर, विक्की कौशल आणि अनिल कपूर आहेत. 

 

एका वर्षात 20 किलो वजन कमी केले 
भूमीला हिट 'दम लगा के हइशा'मधून पहिला ब्रेक मिळाला होता. यात भूमीने जाड महिलेची भूमिका केली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यासाठी वाढवण्यात आलेले २० किलो वजन भूमीने एका वर्षात कमी केले होते, तर दुसऱ्या 'टॉयलेट : एक प्रेमकथा'मध्ये तिने अक्षय कुमारच्या अपोझिट छोट्या शहरातील युवा महिला 'जया'ची भूमिका केली होती. यातदेखील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. याशिवाय रोमाँटिक चित्रपट 'शुभ मंगल सावधान' आणि झोया अख्तरचा माहितीपट 'लस्ट स्टोरीज' मध्येदेखील समीक्षकांकडून तिचे कौतुक झाले होते. 

 

'मया'विषयी भूमी म्हणाली...

मला हा चित्रपट मिळाल्याने मी खूप खुश आहे. मला प्रत्येक चित्रपटात जोखीम घ्यायला आवडते. एक कलाकार म्हणून मला हे सर्व रोमांचित करून जाते. मला एखादा चित्रपट मिळाला तर मी इतके खुश होते. त्यात आपले सर्वस्व झोकून देते. त्याला शंभर टक्के देण्यासाठी मी धडपड करते. प्रेक्षकांना चांगल्यात चांगले द्यावे असा मी नेहमी विचार करत असते. स्क्रिप्ट वाचत असतानाच माझ्या डोक्यात या सर्व गोष्टी फिरत असतात. 

 

बातम्या आणखी आहेत...