आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटर दादीची शैली शिकण्यासाठी...भूमीने आईकडून घेतले दोन महिने हरियाणवी धडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत लहानाची मोठी झालेली भूमी पेडणेकरची आई सुमित्रा हुडा पेडणेकर अर्ध्या हरियाणवी आहेत. याचाच फायदा भूमीने आपला आगामी चित्रपट ‘सांड की आंख’साठी घेतला आहे. या चित्रपटात आपले पात्र शूटर दादी चंद्रो तोमर यांची भाषाशैली शिकण्यासाठी भूमीने आईकडून दोन महिने हरियाणवी भाषेचे धडे घेतले. भूमी आपल्या आईसोबत सेटवर जात होती आणि प्रत्येक रात्री तिच्यासोबत उच्चारांचा सराव करत होती. आपले संवाद म्हणताता जिथे-जिथे चुका व्हायच्या तिथे तिची आई त्यात सुधारणा करत होती.  भूमी म्हणते, ‘ही भूमिका साकारण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया गंभीर आणि सर्जनशील होती. मला पडद्यावर आपले पात्र खऱ्या पात्रासारखे साकारायचे होते. चित्रपटासाठी मला हरियाणवी भाषेवर प्रभुत्व मिळवायचे होते आणि या कामी मी आपल्या आईची घेतली. आई मूळ हरिणाची असल्याचे तेथील संस्कृती तिला चांगल्याप्रकारे माहीत आहे. तिने भाषेपासून ते बॉडी लँग्वेजपर्यंत सुधारणा करण्यामध्ये माझी मदत केली. शूटिंगदरम्यान पूर्ण २ महिन्यांपर्यंत ती माझ्यासोबत होती. ज्याप्रकारे मी शिकले त्यामुसार दादीचे पात्र समजून घेण्यासाठी तिने माझी मदत केली.’

बातम्या आणखी आहेत...