आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तख्त' माझ्या कारकीर्दीसाठी ठरू शकतो मैलाचा दगड : भूमी पेडणेकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: भूमी पेडणेकर लवकरच करण जोहरच्या आगामी 'तख्त' चित्रटाचे शूटिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि इंडस्ट्रीत तिचा प्रवास कसा राहिला यावर एक रिपोर्ट... 

यश राज फिल्म सोबत सहा वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर भूमी पेडणेकरने 2015 मध्ये याच बॅनरच्या दम लगा के हईशा चित्रपटातून पदार्पण केले होते. या रोमाँटिक-कॉमेडी चित्रपटात भूमीने दमदार अभिनय केला होता. या अभिनयामुळै तिला त्या वर्षी बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 'टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि 'शुभ मंगल सावधान' सह आतापर्यंत भूमीने तीन चित्रपट केले आहेत आणि हे तिन्ही चित्रपट यशस्वी ठरले. त्यामुळेच निर्माता करण जौहरने तिला आपल्या मोठ्या बजेट आणि कलाकारांची फौज असलेल्या 'तख्त' मध्ये घेतले आहे. 


आपल्या पहिल्या 'दम लगा के हईशा' चित्रपटासाठी भूमीने वजन वाढवले होते, त्यानंतर तिने आपले वजन कमी केले. हा बदल इंडस्ट्रीने पाहिला, तिचे कौतुकही केले. या चित्रपटाच्या यशानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर दुसरा चित्रपट 'टॉयलेट : एक प्रेम कथा' मध्ये तिने अक्षय कुमारसोबत काम केले. या चित्रपटात छोट्या शहरातील प्रगतिशील युवा महिला जयाच्या भूमिकेतून भूमीने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर ती 'शुभ मंगल सावधान' मध्ये सुगंधाच्या भूमिकेत दिसली. या रोमँटिक चित्रपटातून भूमीने आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांना प्रभावित केले. चित्रपटातच नव्हे तर भूमीने आपली प्रतिभा वेब सिरीज 'लास्ट स्टोरीज' मध्येदेखील दाखवली. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात तिचे गंभीर भूमिकेसाठी कौतुक झाले. 


आता लवकरच भूमी पडद्यावर एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. ती 70 च्यादशकातील कथेत चंबळ घाटीत एका ग्रामीण मुलीची आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित गुन्हेगारीवर आधारित या 'सोन चिरैया' चित्रपटात भूमी मुख्य भूमिकेत आहे. मात्र सर्वात मोठी संधी करण जोहरचा ऐतिहासिक चित्रपट 'तख्त' आहे, ता महत्त्वाचा ठरू शकतो, असे भूमी मानते. यात रणवीर सिंह, आलिया भट्ट, करिना कपूर खान, विक्की कौशल आणि अनिल कपूर सारखे मोठे कलावंत आहेत. 

 

भूमी म्हणाली... 
'तख्त' माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. करणचे मी नेहमी प्रशंसा करत असते. या महान चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी अभिमानासारखे आहे.मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. जास्त वाट मी पाहू शकत नाही. हा चित्रपट माझ्यातील चांगली कलावंत शोधण्यात मदत करेल, शिवाय हा माझ्या कारकीर्दीसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. मी यासाठी काहीही करायला तयार आहे.' 

बातम्या आणखी आहेत...