आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BHumi Will Paly Vidya Sinha's Role And Ananya Will Be In Ranjita's Role In Remake Of 'pati, Patni Aur Wo'

'पती, पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये विद्या सिन्हाचे पात्र साकारणार भूमी, तर अनन्या असेल रंजिताच्या भूमिकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : सत्तरच्या दशकामध्ये रिलीज झालेला संजीवकुमार, रंजिता कौर आणि विद्या सिन्हा अभिनीत चित्रपट 'पती पत्नी और वो'च्या रिमेकची शूटिंग ९ जुलैपासून लखनऊमध्ये सुरू होत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेदेखील असतील. तिन्ही मुख्य कलाकारांनी आपले आतापर्यंतचे सर्व प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत, जेणेकरून या चित्रपटाची शूटिंग लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल. यामध्ये कार्तिकचा लूकसुद्धा काहीसा वेगळा दिसणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी रिलीज होईल. 

 

उत्तर प्रदेश असेल पार्श्वभूमी... 
मूळ चित्रपटामध्ये रंजिता कौरने साकारलेले पात्र अनन्या यामध्ये साकारणार आहे. भूमी विद्या सिन्हाने साकारलेले पात्र करेल. कार्तिक यात कदाचित पहिल्यांदाच मिशांमध्ये दिसेल. जुन्या चित्रपटाची कथा मुंबईच्या धर्तीवर होती, परंतु हा रिमेक उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर असेल. भूमी आणि अनन्याच्या पात्रांचे गेटअप तयार केले जाईल. 

 

आणखी एक रिमेक ... 
- 70 च्या दशकात रिलीज झाला होता मूळ चित्रपट 
- 09 जुलैपासून लखनऊमध्ये सुरू होईल शूटिंग 
- 06 डिसेंबर रोजी रिलीज होणार याच वर्षी 
- कार्तिकने सोमवारी 'लव आज कल 2' ची शूटिंग पूर्ण केली. 
- भूमीदेखील 'बाला'चे शूटिंग शेड्यूल पूर्ण करून त्यांना जाॅइन होणार आहे. 

 

विवाहबाह्य संबंधांवर आधारित या वर्षातील दुसरा चित्रपट...  
विवाहबाह्य संबंधांवर आधारित या वर्षीचा हा चित्रपट 'दे दे प्यार दे'नंतरचा दुसरा चित्रपट असेल. ट्रेड पंडितांच्या मते, या विषयावर आधारित चित्रपटांचा सक्सेस रेट चांगला राहिला आहे. याच विषयावर 'सिलसिला', 'गुमराह', 'लाइफ इन अ मेट्रो', 'अर्थ', 'रुस्तम' आणि 'मस्ती' यासारखे चित्रपट हिट ठरले आहेत. हा विषय प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करत आला आहे. तथापि, या काळात 'हमारी अधूरी कहानी' आणि 'कभी अलविदा न कहना' इत्यादी चित्रपटही आले, परंतु ते हिट ठरले नाहीत. 

 

भूमीने आपल्या पात्राबाबत सांगितले की, 'यातील माझे पात्र खऱ्या आयुष्यातील पात्राशी मिळतेजुळते आहे. मी खूप अॅम्बिशियसही आहे आणि आयुष्यात मोठे करू इच्छिते.' लोक मला अशा एखाद्या पात्रामध्ये पहिल्यांदा पाहतील, असा दावाही भूमीने केला आहे.