आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांपूर्वी या टीव्ही शोमध्ये झळकली होती 'तेरे नाम'ची अॅक्ट्रेस, पहिल्याच एपिसोडनंतर झाली होती बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री भूमिका चावलाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 ऑगस्ट 1978 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या भूमिकाचे खरे नाव रचना चावला आहे. बॉलिवूडमध्ये तिला सलमान खान स्टारर 'तेरे नाम' या चित्रपटातील निर्जराच्या रुपात ओळखले जाते. पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी भूमिका सर्वप्रथम छोट्या पडद्यावर झळकली होती.  'हिप-हिप हुर्रे' या मालिकेत ती झळकली होती. ही मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती आणि 2001 मध्ये मालिकेने छोट्या पडद्यावरुन निरोप घेतला. 

 

फक्त एकाच एपिसोडमध्ये झळकली होती भूमिका.. 

- भूमिका 'हिप-हिप हुर्रे'च्या फक्त एकाच एपिसोडमध्ये झळकली होती. त्यानंतर तिने मालिका सोडली. असे म्हटले जाते की, भूमिकाला त्याकाळात चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या होत्या, त्यामुळे तिने मालिकेतून काढता पाय घेतला होता. 'हिप-हिप हुर्रे'च्या दोन वर्षांनी म्हणजे 2000 साली तिचा पहिला तेलुगु चित्रपट 'Yuvakudu' रिलीज झाला होता. तर तीन वर्षांनी म्हणजे 2003 साली तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'तेरे नाम' रिलीज झाला होता. या चित्रपटात तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. 

 

'जब वी मेट'साठी पहिली पसंत होती भूमिका... 
- 'तेरे नाम'नंतरचा भूमिकाचा दुसरा हिट बॉलिवूड चित्रपट 'रन'  हा आहे. यामध्ये ती अभिषेक बच्चनच्या अपोझिट झळकली होती. त्यानंतर मात्र तिचे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ लागले. करीना कपूर आणि शाहिद कपूर स्टारर 'जब वी मेट'मधील गीतच्या रोलसाठी दिग्दर्शक इम्तियाज अलींची पहिली पसंती भूमिकाला होती. भूमिकाने स्वतः एका मुलाखतीत ही गोष्ट कबुल केली होती की, तिने 'जब वी मेट'ची ऑफर नाकारली होती. पण जेव्हा भूमिकाने थिएटरमध्ये हा चित्रपट बघितला होता, तेव्हा तिने भरभरुन करीनाच्या अभिनयाचे कौतुक केले होते. ती म्हणाली होती की, करीनाव्यतिरिक्त गीत भूमिका दुसरी कुठलीही अभिनेत्री साकारु शकली नसती. भूमिकानंतर या भूमिकेसाठी आयशा टाकियाला अप्रोच केले गेले होते. 

 

- 2007 साली जेव्हा 'जब वी मेट' रिलीज झाला होता, त्याचवर्षी भूमिकाने योग गुरु भरत ठाकुरसोबत लग्न केले होते. त्यावेळी चर्चा होती की, भूमिका चित्रपटांमध्ये काम करणे भरतला पसंत नाही. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावादेखील निर्माण झाला होता. पण स्वतः भूमिकाने या गोष्टीचा इंकार केला होता. 2014 मध्ये भूमिकाच्या मुलाचा जन्म झाला. भूमिकाच्या सध्याच्या फिल्मी करिअरविषयी सांगायचे झाल्यास, ती साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. अलीकडच्या काळात ती 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. 

बातम्या आणखी आहेत...