आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन एप्रिलमध्ये : स्वामी गोविंदगिरी यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक ४ एप्रिलला होणार आहे

नगर - अयोध्येतील भव्य अशा प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन येत्या ३० एप्रिल रोजी करण्याचे नियोजन चालू आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी रविवारी येथे बोलताना दिली. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक ४ एप्रिलला होणार आहे, असेही ते म्हणाले.येथील लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाच्या वतीने स्वामी गोविंदगिरी यांचा सहकार सभागृहात सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.  मंदिराचा सध्याचा आराखडा आहे ९० टक्के स्वीकारला गेला आहे. भूमिपूजन पूर्णपणे वैदिक पद्धतीने होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तीन वर्षांत मंदिर उभारणीचे लक्ष्य आहे. निधी संकलन लवकरच सुरू होईल, असेही गोविंदगिरी यांनी सांगितले. तिरुपती बालाजीने १०० कोटींची पहिली देणगी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे राम मंदिरासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. आणखी एका देवस्थानने १० कोटी दिले आहेत. अयोध्येत महाराष्ट्र भवन होणार असेल तर त्याचा आनंद आहे. अयोध्येत प्रत्येक राज्याचे भवन उभारल्यास अयोध्या ही देशाची सांस्कृतिक राजधानी नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.बातम्या आणखी आहेत...