Home | National | Other State | BHU's 20 Doctor teams perform surgery in four and a half hours in Uttar Pradesh belt

उत्तर प्रदेशात पोटापर्यंत चिकटलेल्या जुळ्यांची बीएचयूच्या 20 डॉक्टरांच्या पथकाने साडेचार तासांत केली शस्त्रक्रिया

अमित मुखर्जी | Update - Dec 09, 2018, 09:05 AM IST

डॉक्टर म्हणाले-१० लाख मुलांत एक जुळे अशा प्रकारचे जन्मते

  • BHU's 20 Doctor teams perform surgery in four and a half hours in Uttar Pradesh belt

    वाराणसी- वाराणसीच्या बीएचयू रुग्णालयात (बनारस हिंदू विद्यापीठ) गुरुवारी ४ दिवसांच्या जुळ्या मुलींवर शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळे करण्यात यश आले आहे. दोन्ही मुली छातीपासून पोटापर्यंत एकमेकींना जोडलेल्या होत्या. त्यांना वेगळे करण्यासाठी २० डॉक्टरांचे पथक साडेचार तास झटत हाेते.

    डॉक्टर वैभव पांडे यांनी सांगितले, सुरुवातीला मुलींचा रक्तदाब, शर्करा आणि हृदयाचे ठोके आदींची तपासणी करण्यात आली. दोघींनाही एकाच वेळी बेशुद्ध करणे हेही एक आव्हान होते. दहा लाख मुलांमध्ये एक जुळे अशा पद्धतीने जन्मते. सध्या दोघींची प्रकृती उत्तम आहे. काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाईल. शस्त्रक्रिया करण्यासाठी रेडिओलॉजी, अॅनेस्थेशिया व शस्त्रक्रियागारातील तज्ज्ञ अशी दोन पथके तयार करण्यात आली. दोन मॉनिटर व रक्तासह सर्व दुप्पट तयारी करण्यात आली होती. कारण यकृतातून रक्त खूप वाहते. त्यानंतर दोन्ही मुलींना वेगळे करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांची हृदये वेगळी होती.

    अशा शस्त्रक्रियेसाठी लागतात ६ लाख रु.
    एमएस डॉ. व्ही. एन. मिश्रा यांनी सांगितले, साधारणत: अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेस ६ लाख रुपये खर्च येतो. परंतु या दोन्ही मुलींच्या सर्व चाचण्या व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. या मुलींचा जन्म गाझीपूर येथील रुग्णालयात झाला. केस गंभीर असल्याने त्यांना बीएचयूमध्ये दाखल करण्यात आले. मुलींचे वडील राजेशकुमार एका खासगी कंपनीत काम करतात.

Trending